नांदेड हादरलं! 7 वर्षांच्या शाळकरी मुलीवर शिक्षकाचा लैंगिक अत्याचार, आरोपी पोलिसांच्या ताब्यात...

मुंबई तक

नांदेडमधील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या 7 वर्षीय मुलीवर तिच्याच शाळेतील शिक्षकाने घृणास्पद कृत्य केल्याची बातमी समोर आली आहे.

ADVERTISEMENT

शाळकरी मुलीवर शिक्षकाचा लैंगिक अत्याचार
शाळकरी मुलीवर शिक्षकाचा लैंगिक अत्याचार,
social share
google news

बातम्या हायलाइट

point

7 वर्षांच्या शाळकरी मुलीवर शिक्षकाचा लैंगिक अत्याचार

point

नांदेड शहरातील धक्कादायक घटना

Crime News: नांदेडमध्ये एका शाळकरी विद्यार्थीनीसोबत तिच्याच शाळेतील शिक्षकाने घृणास्पद कृत्य केल्याची बातमी समोर आली आहे. प्रकरणातील पीडिता ही 7 वर्षांची असून ती नांदेड शहरातील इंग्रजी शाळेत शिकत असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित घटना बुधवारी (19 नोव्हेंबर) घडल्याचं वृत्त आहे. 

पीडितेने आईला सगळंच सांगितलं... 

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड शहरातील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या 7 वर्षीय विद्यार्थीनीवर त्याच शाळेतील शिक्षकाने लैंगिक अत्याचार केला. काल म्हणजेच 20 नोव्हेंबर रोजी पीडिता शाळेत जाण्यास नकार देत होती. मुलगी शाळेत का जात नाही? हे जाणून घेण्यासाठी पीडितेच्या आईने तिची विचारपूस केली. त्यानंतर, मुलीने जे काही सांगितलं ते ऐकून आईला मोठा धक्का बसला. पीडितेसोबत तिच्या शाळेतील शिक्षकाने घृणास्पद कृत्य केलं असून घाबरून शाळेत जाण्यास नकार देत असल्याचं मुलीने आपल्या आईला सांगितलं. 

हे ही वाचा: सावधान! शेअर मार्केटच्या ग्रुपमध्ये जॉइन केलं अन् ठाण्यातील वृद्धाला 6.44 कोटी रुपयांना गंडा... पोलिसांचं नागरिकांना आवाहन

मुलीच्या आईने दाखल केली तक्रार 

मुलीचं म्हणणं ऐकून आईचा राग अनावर झाला. त्यानंतर, आईने आपल्या मुलीसह भाग्यनगर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आरोपी शिक्षकाविरुद्ध तक्रार नोंदवली. पोलिसांनी पीडितेच्या आईने नोंदवलेल्या तक्रारीनुसार, आरोपी शिक्षकाविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या 64(2), 65(2) ,351(2) अंतर्गत आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यातील कलम 468 अंतर्गत गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास केल्यानंतर, घटनेतील आरोपी विशाल लोखंडे याला अटक करण्यात आली आहे. 

हे ही वाचा: मंदिरात घेऊन गेली आणि आईने पोटच्या मुलीवरच केला कुऱ्हाडीने हल्ला! नेमकं प्रकरण काय?

शाळकरी मुलींच्या सुरक्षेबाबत प्रश्न 

हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आल्यानंतर, नांदेड शहरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच, या घटनेमुळे शाळकरी मुलींच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. आता, पोलीस न्यायालयाला हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याची विनंती करणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैजंने यांनी दिली. 

हे वाचलं का?

    follow whatsapp