अंबरनाथमध्ये भीषण अपघात, भरधाव कारने अनेक दुचाकींना चिरडले, घटनेचा थरार CCTV मध्ये कैद

मुंबई तक

Thane Accident : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्य़े एक भीषण अपघाताची दुर्दैवी घटना घडली आहे. हा अपघात अंबरनाथच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जाणाऱ्या पुलावर झाला असल्याची माहिती समोर आली. एका भरधाव वेगाने आलेल्या वाहनाने धडक दिल्याने ही भीषण घटना घडली आहे.

ADVERTISEMENT

Thane Accident
Thane Accident
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये भीषण अपघात

point

घटनास्थळी मोठी खळबळ

point

नेमकं काय घडलं?

Thane Accident : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्य़े एक भीषण अपघात घडला आहे. अंबरनाथच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या पुलावर हा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली. एका भरधाव वेगाने आलेल्या वाहनाने धडक दिल्याने ही धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी मोठी खळबळ उडाली असून या अपघाताची माहिती पोलिसांना समजताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. 

हे ही वाचा : जालन्यात 13 वर्षीय शाळकरी मुलीने उचललं टोकाचं पाऊल, शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने भीषण अपघात

अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर वाहतूक कोंडीची समस्या नेहमी भेडसावत असते. त्याच ठिकाणी एक कार हुतात्मा चौकाहून आली आणि  अंबरनाथच्या पश्चिमेकडे जाताना काही वाहनांना धडक दिली. कार चालवत असताना ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने हा भीषण अपघात झाला. ही धडक इतकी जोराची होती की एकजण थेट ब्रिजच्या खाली कोसळला. तर काही जण ब्रिजवरतीच आदळल्याचे चित्र दिसून आले. तर काही जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद 

या झालेल्या अपघातानंतर धडक देणारी कार पलटी झाली आणि या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. व्हिडिओत काही मुलं घटनास्थळी जमा झाल्याचे दिसून येत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला.  

हे ही वाचा : चंद्रपूर हादरलं! हॉस्टेलमध्ये मानसिक त्रास, अखेर 17 वर्षाच्या तरुणाने दोर आवळत संपवलं जीवन, 'त्या' चौघांचं नाव समोर

दरम्यान, ज्या कारने हा अपघात केला होता, ती कारी नेमकी कोणाची आहे? ते अद्याप समोर आलेलं नाही. या घटनेतील जखमींवर उल्हसनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी पाठवले आहे. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं पसिरात एकच खळबळ उडाली आहे.  

हे वाचलं का?

    follow whatsapp