डान्सबारमध्ये काम करणाऱ्या तरुणीसोबत त्याचा विवाह, पत्नीवर लक्ष ठेवायला घरात बसवले सीसीटीव्ही, पोलिसही चक्रावले
Crime news : एका महिलेच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्याचं प्रकरण समोर आलं आहे. तिच्यावर पतीने सीसीटीव्हीच्या माध्यमातून पाळत ठेवली आहे. जेव्हा महिलेनं पोलिसांना याबाबत सांगितले असता, सर्वांना ऐकून आश्चर्याचा धक्का बसला. नेमकं प्रकरण काय आहे ते जाणून घ्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पतीने घरात बसवले CCTV
कोलकाता येथे पत्नी बारगर्ल म्हणून कार्यरत होती...
Crime news : मेरठमध्ये एका महिलेच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्याचं प्रकरण समोर आलं आहे. तिच्यावर पतीने सीसीटीव्हीच्या माध्यमातून पाळत ठेवली आहे. जेव्हा महिलेनं पोलिसांना याबाबत सांगितले असता, सर्वांना ऐकून आश्चर्याचा धक्का बसला. पोलिसांनी प्रश्न केला की, पती पत्नीवर 24 तास पाळत का ठेवता? याच प्रकरणात महिलेनं नवरा आपल्याला बेदम मारहाण करत असल्याचा दावा देखील केला. हा संपूर्ण घटना मेरठच्या पोलीस ठाणे परिसरातील नूर नगरमध्ये घडली आहे. पीडितेचं नाव शाहीन असे असून पतीचं नाव राजेश असे आहे.
हे ही वाचा : पालघर साधू हत्याकांडातील आरोपीला पक्ष प्रवेश दिल्याने विरोधकांनी घेरलं, आता भाजपचा मोठा निर्णय
पतीने पत्नीसाठी घरात बसवले CCTV
पीडित पत्नीने दावा केला की, राजेशच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. तिच्यावर सतत लक्ष ठेवले जात आहे. तिचा नवरा तिला वेळोवेळी मारहाण करायचा. तसेच अलिकडेच त्याने तिला बेदम मारहाण केली होती, त्या मारहाणीच ती जखमी झाली होती.
कोलकाता येथे पत्नी बारगर्ल म्हणून कार्यरत होती...
दरम्यान, पत्नी शाहीनची कोलकाता येथील बार गर्ल म्हणून कार्यरत होती. तीन वर्षांपूर्वी तिची कोलकातामध्ये डान्सबारमध्ये राजेश नावाच्या तरुणाशी मैत्री झाली. नंतर मैत्रीचे प्रेमात रुपांतर होऊन दोघांनी विवाह केला. त्यांच्या लग्नानंतर ते दोघेही मेरठला गेले.
शाहीन म्हणते की राजेशचे आधीच लग्न झाले होते आणि त्याला मुले होती. तिला हे फक्त एका वर्षापूर्वी घटनेची माहिती मिळाली. शाहीन तिच्या पूर्वीच्या पतीपासून विभक्त झाली होती. शाहीन आणि राजेशचा नुकताच विवाह झाला होता आणि त्यांना एक मुल देखील आहे. पण अचानकपणे राजेशला शाहीनवर संशय येऊ लागला होता.










