पालघर साधू हत्याकांडातील आरोपीला पक्ष प्रवेश दिल्याने विरोधकांनी घेरलं, आता भाजपचा मोठा निर्णय
Palghar Sadhu Hatyakand : पालघर हत्याकांडातील आरोपी अशी राळ उडालेल्या काशिनाथ चौधरी यांना भाजपने प्रवेश दिल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. पण अशातच आता महाराष्ट्र भाजपने या निर्णयाबाबत यु टर्न घेत, पक्षातील प्रवेशास स्थगिती दिली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भाजपचा यु टर्न, पत्रक जारी करत पक्षप्रवेश स्थिगीतीचा निर्णय
पालघर साधू हत्या प्रकरण नेमके काय?
Palghar Sadhu Hatyakand : पालघर जिल्ह्यात 2020 साली झालेल्या साधू हत्याकांड प्रकरणातील आरोपी काशिनाथ चौधरी याला भाजपने पक्षात प्रवेश देऊन पवित्र केलं होतं. मात्र, विरोधकांनी चारीबाजूंनी टीकेची झोड उठवल्यानंतर भाजपला आता याबाबत मोठा निर्णय घ्यावा लागलाय. साधू हत्याकांडातील आरोपी काशिनाथ चौधरी यांच्या पक्षप्रवेशाला भाजपने आता स्थगिती दिली आहे. याबाबतचं परिपत्रक भाजपने जारी केलंय.
हे ही वाचा : आर्मी भरतीचं स्वप्न अधुरं, परीक्षेहून येताना 2 जीवलग मित्रांना ऊसाच्या ट्रकने चिरडलं, कोल्हापुरात हळहळ
आरोपी काशिनाथ चौधरी यांच्या पक्षप्रवेशाला भाजपकडून स्थगिती
महाराष्ट्र भाजपने एक पत्र लिहित हा निर्णय घेतला आहे. त्या पत्रकात त्यांनी लिहिलं की, पालघर जिल्ह्यातून पक्षात प्रवेश दिलेल्या काशिनाथ चौधरींबाबत पालघर साधू हत्याकांडाशी संबंधित पुन्हा चर्चा या प्रसिद्धी माध्यम आणि सोशल मीडियाद्वारे समोर आली.
स्थानिक पातळीवर एक विचार करून तथ्यांवर आधारीत त्यांना पक्षात प्रवेश दिल्याची माहिती आता समोर आली. मात्र, या एकूण विषयांबाबत संवेदनशीलता लक्षात घेत, काशिनाथ चौधरी यांच्या पक्ष प्रवेशास तत्काळपणे स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.










