मुलीची तब्येत बिघडल्याने घरी मांत्रिकाला बोलवलं, नंतर बंद खोलीत पीडितेचे कपडे काढले अन् अर्धा तास...

मुंबई तक

जोदू-टोणा करण्याच्या बहाण्याने एका मांत्रिकाने 12 वर्षीय मुलीसोबत अश्लील कृत्य केल्याचं वृत्त आहे. आरोपी मांत्रिकाने पीडितेला बंद खोलीत नेलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

ADVERTISEMENT

पीडितेचे कपडे काढले अन् अर्धा तास...
पीडितेचे कपडे काढले अन् अर्धा तास...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुलीची तब्येत बिघडल्याने घरी मांत्रिकाला बोलवलं

point

नंतर बंद खोलीत पीडितेचे कपडे काढले अन् अर्धा तास...

Crime News: उत्तर प्रदेशातील झाशी येथून माणूसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे, जोदू-टोणा करण्याच्या बहाण्याने एका मांत्रिकाने 12 वर्षीय मुलीसोबत अश्लील कृत्य केल्याचं वृत्त आहे. आरोपी मांत्रिकाने पीडितेला बंद खोलीत नेलं. त्यानंतर, तिचे कपडे काढून तिच्या शरीरावर लिंबू लावून जवळपास अर्धा तास तिच्यासोबत घाणेरडं कृत्य केलं. त्यावेळी, ती मुलगी खूप रडत होती. पण मांत्रिकाने तिच्या आई-वडिलांना खोलीत येण्यापासून रोखलं. अखेर घटनेनंतर, पीडितेने तिच्या आईला तिच्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल सगळं सांगितलं. त्यानंतर, मुलीच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये यासंदर्भात तक्रार दाखल केली. 

मुलीची प्रकृती बिघडल्याने घरी मांत्रिकाला बोलवलं... 

झाशीच्या बरुआसागर पोलीस स्टेशनमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने पोलिसांकडे तक्रार करताना सांगितलं की, त्यांना चार मुली असून त्यांची 12 वर्षांचा मुलगी 8 वीत शिकते. काही दिवसांपासून तिच्या गळ्यात खूप वेदना होत होत्या आणि त्यामुळे तिला व्यवस्थित जेवता देखील येत नव्हतं. तिच्यावर उपचार सुद्धा करण्यात आले पण, तिच्या प्रकृतीत काहीच फरक पडला नाही. दरम्यान, मध्य प्रदेशातील निवाडी जिल्ह्यात राहणारा हरभजन नावाचा मांत्रिक जादू-टोणा करून प्रकृती ठिक करत असल्याची माहिती त्यांना मिळाली. 

त्यानंतर, पीडितेच्या कुटुंबियांनी 18 नोव्हेंबर रोजी हरभजनला घरी बोलवलं. मुलीला पाहिल्यानंतर मांत्रिक म्हणाला की तिच्यावर भूत-प्रेताची सावली असून मुलीला बरं करण्यासाठी एकट्यातच सगळे विधी केले जातील. त्याने मुलीच्या आई-वडिलांना सांगितलं की "तिला घरातील एका खोलीत नेलं जाईल आणि कोणीही आत येऊन नका. विधी सुरू असताना मुलगी जरी रडली तरी सुद्धा कोणीच आत येऊ नका." पीडितेच्या आई-वडिलांनी मांत्रिकाच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. 

हे ही वाचा: मुंबई: राहत्या फ्लॅटवरून जोडप्यात वाद! संतापलेल्या पतीने बायकोच्या डोक्यात दगड घातला अन्...

बंद खोलीतील पीडित मुलीवर अत्याचार

त्यानंतर, मांत्रिकाने मुलीला एका खोलीत नेलं, तिचे कपडे काढले आणि तिच्या अंगावर लिंबू लावून तिच्यासोबत अश्लील कृत्ये करण्यास सुरूवात केली. त्यावेळी, मुलगी खूप रडत होती. पण मांत्रिकाने तिच्या आई-वडिलांना आत येण्यापासून रोखलं. अर्ध्या तासानंतर, तो बाहेर आला आणि विधी पूर्ण झाल्याचं त्याने सांगितलं. मात्र, पीडिता बाहेर पडल्यानंतर आईला बिलगून खूप रडत होती. आईने तिची विचारपूस केली असता मुलीने रडत रडत मांत्रिकाच्या अश्लील कृत्याबद्दल सांगितलं. 

हे वाचलं का?

    follow whatsapp