Jawan Trailer : शाहरूखचा डॅशिंग लूक, दमदार अ‍ॅक्शन आणि ड्रामा...,बहुचर्चित 'जवान'चा ट्रेलर प्रदर्शित - Mumbai Tak - jawan trailer out of shah rukh khan movie action and drama nayanthara vijay sethupati - MumbaiTAK
बातम्या मनोरंजन

Jawan Trailer : शाहरूखचा डॅशिंग लूक, दमदार अ‍ॅक्शन आणि ड्रामा…,बहुचर्चित ‘जवान’चा ट्रेलर प्रदर्शित

बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खानच्या जवान सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला आहे. या ट्रेलरमध्ये शाहरूख खान दमदार अ‍ॅक्शन सीन्स करताना दिसला आहे. त्यामुळे शाहरूखचे अ‍ॅक्शन सीन्स आणि डायलॉग डिलीव्हरी पाहता हा सिनेमा देखील पठाण प्रमाणे हिट ठरले अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
jawan trailer out of shah rukh khan movie action and drama nayanthara vijay sethupati

Shahrukh Khan jawan Movie Trailer : बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खानच्या (Shahrukh khan) जवान (Jawan) सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला आहे. या ट्रेलरमध्ये शाहरूख खान दमदार अ‍ॅक्शन सीन्स करताना दिसला आहे. त्यामुळे शाहरूखचे अ‍ॅक्शन सीन्स आणि डायलॉग डिलीव्हरी पाहता हा सिनेमा देखील पठाण प्रमाणे हिट ठरले अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (jawan trailer out of shah rukh khan movie action and drama nayanthara vijay sethupati)

ट्रेलरआधी जवान सिनेमाचा पोस्टर लाँच करण्यात आला होता. या पोस्टरमध्ये शाहरूख खान तोंडावर पट्टी लावलेल्या अवस्थेत म्हणजेच जखमी दाखवण्यात आला होता. त्यामुळे साहजिक चाहत्यांना ट्रेलरमध्ये दमदार अ‍ॅक्शन आणि फाईट सीन्सची पाहण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा होती आणि तसेच घडले आहे.

हे ही वाचा : Abdul Karim Telgi : ट्रेनमध्ये विकायचा शेंगदाणे! 30,000 कोटींचा घोटाळा करणारा तेलगी कोण?

जवानच्या ट्रेलरमध्ये शाहरूख खान दमदार लुक्ससह अ‍ॅक्शन सीनमध्ये दिसला आहे. या सिनेमात साऊथचाही तडका लागणार आहे. कारण अभिनेत्री नयनतारा आणि अभिनेता विजय सेतूपती देखील या सिनेमात दिसणार आहे. अभिनेत्री नयनतारा पोलिसांच्या भुमिकेत आहे. आपल्या मिशनवर निघालेल्या शाहरूखला रोखण्यासाठी नयनतारा प्रयत्न करताना दिसते. या दरम्यान ती देखील तुफानी अ‍ॅक्शनमध्ये दिसणार आहे. तर विजय सेतूपती विलनच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे शाहरूख आणि सेतूपती यांच्यातलाही संघर्ष पाहायला मिळेल.

जवानच्या टीझरनध्ये शाहरूख खानची गर्ल गँग देखील दाखवण्यात आली आहे. आपल्या हेड शाहरूख खानसह ही गर्ल गँगही दमदार अ‍ॅक्शनमध्ये दिसणार आहे. या गर्ल गँगमध्ये सान्या मल्होत्रा, प्रियामणी, आश्लेषा ठाकूर, लहर खान,रिद्धी डोगरा, संजीता भट्टाचार्या, गिरीजा ओक गोडबोले आणि आलिया खुरेशी या तरूणी आहेत.ट्रेलरमध्ये शाहरूख खानचं या गर्ल गँगसोबत खास कनेक्शन आहे. शाहरूख सोबत या मुली अशी टीम बनवत आहेत, ज्या टीमला तोंड देणे कोणत्याही शत्रूला अवघड जाणार आहे.

शाहरूख खानचा मास अवतार, विजय सेतूपतीचा खलनायकी रोल आणि नयनताराचा दमदार अभिनय या सिनेमाला स्फोटक चित्रपट बनवत आहे. या तिघांच्या दमदार अ‍ॅक्शन, अभिनयाच्या जोरावर हा सिनेमा हिट ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

हे ही वाचा : India Alliance : …म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी वंचित आघाडीला सोबत घेत नाहीये

या सिनेमाला ट्रेलर रिलीज होताच युट्युबवर तीन तासातच 7 लाख लोकांनी हा ट्रेलर पाहायला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद पाहता आता पठाण प्रमाणेच शाहरूखचा हा सिनेमा देखील हिट ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान जवान हा सिनेमा येत्या 7 सप्टेंबर 2023 ला सिनेमागृहात रिलीज होणार आहे. या सिनेमाची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

 

World Heart Day: तुम्हाला पण ‘ही’ लक्षणं दिसतायेत? वेळीच डॉक्टरांकडे जा, नाहीतर… Eknath Shinde : श्रीकांत शिंदे उतरले पाण्यात… मुख्यमंत्र्यांनी बाप्पाला कसा दिला निरोप? Priyanka Chopra: सुंदर दिसण्यासाठी सर्जरी केली अन् प्रियांका कशी फसली? Dengue : डेंग्यू झाल्यास ‘या’ गोष्टी अजिबात विसरू नका, एक चूक पडेल महागात Esha Gupta : आउटडोर शुटच्या बहाण्याने…, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव Ganpati 2023: गणपती बाप्पासोबत ‘मोरया’ का म्हणतात? पितृ पक्ष उद्यापासून होणार सुरू! का आहे एवढं महत्त्व? Dengue food not to eat : डेंग्यू झाल्यानंतर हे पदार्थ अजिबात खाऊ नका! Rashmika Mandanna चा 6 वर्षांपूर्वी मोडला होता साखरपुडा, आता… बघावं ते नवलच! ‘या’ बाळालाही आली दाढी मिशी… कोहलीशी पंगा घेतला, खेळाडूचा 24 व्या वर्षी अचानक क्रिकेटमधून संन्यास लालबागचा राजा निघाला! भेटीसाठी मुंबईच्या रस्त्यावर भक्तांचा ‘महापूर’ आत्मविश्वास वाढवण्यासाठी महिलांनी ‘या’ टिप्स नक्की करा फॉलो! Ganpati Visarjan 2023: लालबागच्या राजाची थाटात मिरवणूक! बनला ‘चंदू चायवाला’ पण चमकलं असं नशीब की… Alia Bhatt ने वाढदिवसाला सांगितलं रणबीर कपूरचं सीक्रेट! Raveena Tandon चं करिअर करिष्मामुळे फ्लॉप? म्हणाली.. अभिनेत्रीला सेटवरून काढलं, लोकप्रिय होऊनही करावा लागला संघर्ष! रवीना-अक्षयचं झालं होतं ब्रेकअप? पहिल्यांदाच EX वर दिली प्रतिक्रिया Jio vs Airtel: सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान कोण देणार?