Bigg Boss 18: 'माझं एन्काउंटर होणार होतं...', पवारांचं नाव घेत सदावर्तेंनी बिग बॉसच्या घरात उडवली खळबळ

मुंबई तक

ADVERTISEMENT

bigg boss 18 gunaratna sadavarte encounter going sharad pawar case and threat call from underworld dawood ibrahim before enter salman khan show big reavelation
बिग बॉसच्या घरात सदावर्तेंचा खळबळजनक खुलासा
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ढाराढूर झोपल्या कारणाने सदावर्ते प्रचंड चर्चेत

point

मला कराचीतून धमकीचा फोन आला

point

गुणरत्न सदावर्तेचा खळबळजनक खुलासा

Gunaratna Sadavarte Big Revealation on Bigg Boss House : बिग बॉस हिंदीच्या 18 व्या सीझनमध्ये वकील गुणरत्न सदावर्ते सामील झाले आहेत. त्यानंतर पहिल्याच दिवशी नियमभंग करून ढाराढूर झोपल्या कारणाने ते प्रचंड चर्चेत आले होते. त्यानंतर आता सदावर्ते यांनी बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्यापुर्वी अंडरवर्ल्डमधून धमकी आल्याचा खुलासा केला आहे. त्याचसोबत शरद पवारांच्या (Sharad Pawar) एका प्रकरणात पोलीस त्यांचं एन्काऊंटर करणार होते, असा खळबळजनक खुलासा सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी केला आहे. सदावर्ते यांच्या या खुलास्यानंतर इतर सदस्यांना धक्काच बसला आहे.  (bigg boss 18 gunaratna sadavarte encounter going sharad pawar case and threat call from underworld dawood ibrahim before enter salman khan show big reavelation) 
 
 बिग बॉस हिंदीच्या 18 व्या सीझनचा पहिला एपिसोड सोमवारी रात्री टीव्हीवर प्रसारीत झाला होता. या एपिसोडमध्ये सदावर्ते यांनी मोठे खुलासे केले आहेत. खरं तर बिग बॉसच्या घरात सदावर्ते शेहजादा धामी, नायरा बॅनर्जी आणि श्रुतिकासोबत बसले होते. यावेळी इतर सदस्यांशी गप्पा मारत असताना त्यांनी मोठा खुलासा केला. ''मी बिग बॉसच्या घरात प्रवेश करत असल्याचे त्यांना (अंडरवर्ल्डला) कळताच, रात्री 8.30 वाजता मला कराचीतून धमकीचा फोन आला होता''. सदावर्ते यांच्या या खुलास्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. पुढे सदावर्ते म्हणाले की, ''धमकीचा कॉल येताच मी फोन त्याच्या (बिग बॉस) मॅनेजरकडे दिला. आज एफआयआर नोंदवली गेली असेल. यावर इतर सदस्या त्यांना तुम्हाला का धमकी आली? यावर सदावर्ते म्हणाले की, आम्ही अंडरवर्ल्ड दाऊदविरुद्ध लढत राहतो. मॅडम, ती वकील झाली आहे. प्रकरण खूप गुंतागुंतीचे आहे, असा खुलासा सदावर्ते यांनी केला. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Big Boss 18: आधी ढारढूर झोपले अन् नंतर... बिग बॉसच्या घरात सदावर्तेंचा विषय हार्ड नाही भलताच!

 गुणरत्न सदावर्ते यांच्या या खुलास्यानंतर नायरा बॅनर्जी त्यांना म्हणते, 'या सर्व गोष्टी खूप भयानक आहेत'.यानंतर शहजादा धामी त्यांना विचारतो, 'तुम्हाला बिग बॉसचे भांडण खूप हलके वाटत असले? त्याला उत्तर देताना सदावर्ते म्हणतात, 'हे मला घरच्या भांडणासारखं वाटतंय. या सर्व चर्चेनंतर सदावर्ते शरद पवारांच्या एका प्रकरणावरून मोठा खुलासा करतात. 

शरद पवारांच्या घरी तोडफोड करण्यात आली होती. मला या हल्ल्याचा मास्टरमाईंड बनवण्यात आलं होतं. त्यामुळे मला तुरूंगात टाकण्यात आलं होतं. एकदाही जामीन मिळायचा नाही. शेवटी मला पोलीस घ्यायला आली, आणि त्याच दिवशी माझं एन्काऊंटर होणार होतं, असा खळबळजनक खुलासा सदावर्ते यांनी केला.

हे वाचलं का?

 तुरुंगात आरएसएसचा एक माणूस होता. त्या आरएसएसच्या माणसाने मला सांगितले की, जर मी जेलमधून बाहेल आलो तर मला मारून टाकलं जाईल.मी त्यावेळेस डॉक्टरांना विनंती केली की मला 4 वाजेपर्यंत सोडू नका. माझी केस कोर्टात 3 वाजेपर्यंत निकाली निघाली, असे सदावर्ते यांनी सांगितले. 

हे ही वाचा : Gunaratna Sadavarte : पहिल्याच दिवशी Bigg Boss च्या घरात सदावर्ते ढाराढूर झोपले, कोंबडा आरवला तरी...Video व्हायरल!

सदावर्ते पुढे म्हणाले,  'मला सांगण्यात आले होते की, मला कसाबच्या सेलमध्ये हलवण्यात येईल. कसाबनंतर अंडा सेलमध्ये जाणारा मी पहिला माणूस होतो. त्यानंतर माझ्या मुलीने मला जामीन मिळावा यासाठी अर्ज लिहिला. मी बाहेर आलो तेव्हा एका पोलिसाने मला सांगितले, तुला जीवनदान मिळाले, नाहीतर खंडाळ्यात तुझा एन्काऊंटर झाला असता. पण नंतर सरकार बदलले आणि माझे दिवसही बदलले, असा खळबळ उडवणारा खुलासा सदावर्ते यांनी केला. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT