Fandry : 'तुझ्या पिरतीचा इंचू मला चावला', जब्या-शालूची जमली जोडी?
Fandry Movie Star Cast Viral Story : 'जीव झाला येडापीसा रात रात जागनं... तूझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला', नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा फॅंड्री चित्रपट (Fandry Movie) आणि त्यातील या गाण्यांची क्रेझ आजही कायम आहे. 2013 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात खोलवर भिनलेला आहे.
ADVERTISEMENT
Fandry Movie Star Cast Viral Story : 'जीव झाला येडापीसा रात रात जागनं... तूझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला', नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा फॅंड्री चित्रपट (Fandry Movie) आणि त्यातील या गाण्यांची क्रेझ आजही कायम आहे. 2013 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात खोलवर भिनलेला आहे. यातील जब्या आणि शालूची लव्ह केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर प्रचंड हिट ठरली. आता या चित्रपटाला 10 वर्ष उलटले असताना यासंदर्भात एक इंट्रेस्टिंग बातमी समोर आली आहे. (Nagraj Manjule Fandry Movie Star Cast somnath awghade and Rajeshwari Kharat Who played jabya-shalu role are in Relationship)
ADVERTISEMENT
फॅंड्री चित्रपटानंतर जब्या म्हणजेच सोमनाथ अवघडे आणि शालू म्हणजेच राजेश्वरी खरात यांची जोडी पडद्यावर फारशी दिसली नाही. दोघंही सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असतात. पण आता जब्याला खऱ्या आयुष्यात शालुच्या पिरतीचा इंचू चावला की काय? अशी तुफान चर्चा रंगू लागली आहे. यामागचं कारण म्हणजे त्यांचा व्हायरल होणारा फोटो. राजेश्वरी खरातने शेअर केलेल्या एका फोटोमुळे जब्या-शालूची खऱ्या आयुष्यात जोडी जमणार की काय असा चाहते अंदाज लावत आहेत.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोला राजेश्वरी खरातने “कशी काय मग जोडी”, असं कॅप्शन दिलं आहे. त्याचप्रमाणे, शालू, जब्या, फॉरेव्हर असे हॅशटॅग देखील शेअर केले आहेत. या फोटोनंतर दोघांमध्ये नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. दोघांचे फोटो पाहून चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका युजरने लिहिलं, 'जब्याला काळी चिमणी घावली रे', तर आणखी एका युजरने लिहिलंय, 'तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला, माझा जब्या ग जब्या शालू वर मरतो.''
हे वाचलं का?
राजेश्वरी आणि सोमनाथने गेल्यावर्षीही एक व्हिडीओ पोस्ट केला होता. हा व्हिडीओ पोस्ट करताना तिने त्यावर रेड हार्ट इमोजी दिले होते. त्यामुळे त्यावेळीही त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या होत्या. आता यात खरं काय? हे ती दोघंच सांगू शकतात.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT