'मासूम सवाल' सिनेमाच्या पोस्टरचा वाद, सॅनेटरी पॅडवर श्रीकृष्णाचा फोटो दाखवल्याने FIR

नेमका काय आहे या सिनेमाच्या पोस्टरवरून निर्माण झालेला वाद, वाचा सविस्तर बातमी
'मासूम सवाल' सिनेमाच्या पोस्टरचा वाद, सॅनेटरी पॅडवर श्रीकृष्णाचा फोटो दाखवल्याने FIR
film controversy lord krishna pic on- sanitary pad

मासूम सवाल या सिनेमाच्या पोस्टरवरून वाद निर्माण झाला आहे. या सिनेमाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांच्याविरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप या दोघांच्या विरोधात आहे. या सिनेमाच्या पोस्टवर सॅनेटरी पॅडवर श्रीकृष्णाचा फोटो दाखवल्याने हा सगळा वाद निर्माण झाला आहे.

काय आहे मासूम सवालच्या पोस्टरचं प्रकरण?

मासूम सवाल हा सिनेमा ५ ऑगस्टला रिलिज झाला. सिनेमाचा उद्देश मासिक पाळीबाबत जागरुकता निर्माण करणं हा आहे. मात्र सिनेमाच्या पोस्टवरून आता वाद निर्माण झाला आहे. सिनेमाच्या पोस्टरवर भगवान श्रीकृष्णाचा फोटो आहे. मात्र त्यावरूनच सगळा वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर लोक या सिनेमाचं पोस्टर पोस्ट करून राग व्यक्त करत आहेत. सिनेमाच्या निर्मात्यांवर जाणीवपूर्वक हिंदूंच्या भावना भडकवल्याचा आरोप सोशल मीडियावर केला जातो आहे.

मासूम सवाल सिनेमाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांच्याविरोधात FIR

मासूम सवाल या सिनेमाच्या निर्माते आणि दिग्दर्शकांविरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने आज तकशी बोलताना सांगितलं की हिंदू राष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अमित राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनंतर सिनेमाचे दिग्दर्शक संतोष उपाध्याय आणि त्यांच्या कंपनीच्या विरोधात तसंच सिनेमाच्या संपूर्ण टीमच्या विरोधात FIR दाखल करण्यात आली आहे.

हिंदू राष्ट्र नवनिर्माण सेनेने हा आरोप केला आहे की या सिनेमाच्या एका पोस्टरवर सॅनेटरी पॅडवर श्रीकृष्णाचा फोटो लावण्यात आला आहे. सनातन धर्माचे जे अनुयायी आहेत त्यांच्या आणि हिंदू धर्मीयांच्या भावना यामुळे दुखावल्या आहेत. जाणीवपूर्वक ही बाब सिनेमाचे दिग्दर्शक आणि त्यांच्या टीमने केली आहे असाही आरोप या तक्रारींत करण्यात आला आहे. राठोड यांनी न्यूज एजन्सीजना सांगितलं आहे की हिंदू राष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी साहिबाबाद आणि गाजियाबाद या ठिकाणी सिनेमाच्या थिएटर्स बाहेर आंदोलन केलं.

राठोड यांनी हा आरोप केला आहे की सिनेमाच्या पोस्टरवर सॅनेटरी पॅडवर श्रीकृष्णाचा पोटो दाखवण्यात आला आहे. हा हिंदू धर्माचा अपमान आहे. जाणीवपूर्वक असं पोस्टर तयार करण्यात आलं आणि हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावण्यात आल्या आहेत. पोलिसांनी या सगळ्या प्रकारानंतर ज्या ठिकाणी सिनेमाचे खेळ दाखवले जात आहेत तिथे बंदोबस्त वाढवला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in