Prithviraj : पृथ्वीराज चित्रपटाचा टीझर रिलिज, अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर मुख्य भूमिकेत

Prithviraj : पृथ्वीराज चित्रपटाचा टीझर रिलिज, अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर मुख्य भूमिकेत

अक्षय कुमारच्या पृथ्वीराज या सिनेमाचा टीझर नुकताच रिलिज झाला आहे. या चित्रपटाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. अक्षय कुमार या सिनेमात पृथ्वीराज ही मुख्य भूमिका साकारतो आहे. तर संयोगिताच्या भूमिकेत मानुषी छिल्लर झळकणार आहे.

आज रिलिज झालेल्या टीझरची सुरुवात पृथ्वीराज, चौहान यांच्या शौर्याची गाथा सांगून होतो. सर्वोत्तम युद्ध दृश्ये पाहायला मिळतात. यामध्ये संजय दत्तही अक्षय कुमारप्रमाणे अॅक्शन करताना दिसत आहे. त्याच प्रमाणे सोनू सूदही एका वेगळ्या अवतारामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे . त्याचा लूक प्रेक्षकांची उत्सुकता वाढवू शकतो. याआधी सोनू सूद कधीही अशा लूकमध्ये दिसला नाही.

अक्षय सांगतो, “पृथ्वीराजचा टीझर सिनेमाचा आत्मा उलगडतो. महान योद्धा सम्राट पृथ्वीराज चौहान यांना भीती ठाऊक नव्हती. शौर्य हा त्यांच्या जीवनाचा गाभा राहिला. मी त्यांच्याविषयी जितके वाचले, त्यांचा जीवनप्रवास वाचून मी थक्क झालो. या वीराने त्याचा प्रत्येक श्वास देश आणि स्वत:च्या मूल्यांकरिता घेतला.”

अक्षय पुढे सांगतो, “पृथ्वीराज चौहान दिग्गज व्यक्ति असून एक शूर योद्धा आहे. आपल्या देशाने आजवर अनुभवलेला हा सर्वाधिक साहसी राजा आहे. आम्ही या धाडसी शूराला समर्पित केलेल्या मानवंदनेला जगभरातील भारतीय प्रेमाचा वर्षाव करतील ही अपेक्षा करतो. आम्ही शक्य तितक्या अस्सल पद्धतीने योद्ध्याची जीवन कथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि ही कलाकृती त्याचे शौर्य आणि साहसाला वाहिलेली वंदना आहे.”

मानुषीने संयोगिताची भूमिका साकारली आहे. हा मानुषीचा पहिला चित्रपट आहे आणि 2022 च्या बहुप्रतिक्षित पदार्पणापैकी एक आहे. यशराज फिल्म्स निर्मित, पृथ्वीराजचे दिग्दर्शन डॉ चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केले आहे. यांनी “चाणक्य” या सर्वात मोठ्या टेलिव्हिजन एपिक ड्रामाचे दिग्दर्शन केले आहे. हे महाकाव्य नाटक भारतातील सर्वात प्रभावशाली राजकीय रणनीतीकार चाणक्य यांच्या जीवनावर आधारित होते. याशिवाय द्विवेदी यांनी अनेक पुरस्कार विजेत्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. पिंजर हा त्यांचा असाच एक गाजलेला चित्रपट आहे. पृथ्वीराज 21 जानेवारी 2022 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.

सौंदर्यवती मानुषी ही या महान वीराची प्रियतमा संयोगिता हिच्या भूमिकेत दिसणार आहे. तिचे लॉन्च हे 2022 मधील बहुप्रतीक्षित पदार्पण मानले जाते. यश राज फिल्म्सची निर्मिती असलेल्या पृथ्वीराजचे दिग्दर्शन डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केले असून त्यांनी भारतातील सर्वाधिक प्रभावशाली राजनीतितज्ञ चाणक्य यांचे भव्य महाचरित्र टेलिव्हिजनवर दिग्दर्शित केले होते. त्याचप्रमाणे अनेक पारितोषिक-प्राप्त पिंजरचे दिग्दर्शनही केले होते. 21 जानेवारी, 2022 रोजी पृथ्वीराज जगभर प्रदर्शित होणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in