अभिनेत्री सेलीना जेटलीचा पतीकडून शारीरीक छळ, हायकोर्टात धाव, पोटगीसाठी किती कोटी मागितले?

मुंबई तक

Actress Celina Jaitley : अभिनेत्री सेलीना जेटलीचा पतीकडून शारीरीक छळ, हायकोर्टात धाव, पोटगीसाठी किती कोटी मागितले?

ADVERTISEMENT

Actress Celina Jaitley
Actress Celina Jaitley
Google CTA

बातम्या हायलाइट

point

अभिनेत्री सेलीना जेटलीचा पतीकडून शारीरीक छळ

point

हायकोर्टात धाव, पोटगीसाठी किती कोटी मागितले?

मुंबई : अभिनेत्री आणि माजी मिस इंडिया सेलिना जेटली हिने तिच्या ऑस्ट्रियन पती पीटर हाग यांच्या विरोधात गंभीर आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. घरगुती हिंसाचार, शारीरिक अत्याचार आणि मानसिक छळ केल्याचा दावा करत सेलिनाने न्यायालयीन हस्तक्षेपाची मागणी केली. विवाहानंतर पतीकडून सतत होत असलेल्या त्रासाला कंटाळून ऑस्ट्रियाहून भारतात परतण्याशिवाय पर्याय उरला नव्हता, असेही तिने न्यायालयात स्पष्ट केले.

ही याचिका दंडाधिकारी एस. सी. तायडे यांच्या समोर सुनावणीसाठी आली. प्रारंभीची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने तिच्या पती पीटर हाग यांना नोटीस बजावली असून पुढील सुनावणी 12 डिसेंबरला घेण्यात येणार आहे. सेलिना आणि पीटर यांचा विवाह 2010 मध्ये झाला असून दाम्पत्याला तीन मुलं आहेत. विवाहानंतर सेलिनाला काम करण्यावर पतीने निर्बंध घातले, असेही तिने तक्रारीत नमूद केले आहे.

हेही वाचा : अडीच एकरातील पीक हत्तींनी तुडवलं, वर्षभराच्या मेहनतीची राखरांगोळी; नैराश्यात गेलेल्या शेतकऱ्याची आत्महत्या

सेलिनाचा आरोप आहे की, पीटरचा स्वभाव चटकन रागावणारा असून तो अनेकदा मद्यप्राशन करून तिला मारहाण करायचा. या दोन्ही कारणांमुळे तिच्यावर मानसिक ताण वाढत गेला आणि वैवाहिक जीवन असह्य बनले. पतीच्या स्वभावातील बदल, आक्रमक वर्तन आणि सततची हिंसक प्रवृत्ती यामुळे जीवन उद्ध्वस्त झाले, असे सेलिना सांगते.