अडीच एकरातील पीक हत्तींनी तुडवलं, वर्षभराच्या मेहनतीची राखरांगोळी; नैराश्यात गेलेल्या शेतकऱ्याची आत्महत्या
farmer commits suicide : अडीच एकरातील पीक हत्तींनी तुडवलं, वर्षभराच्या मेहनतीची राखरांगोळी; नैराश्यात गेलेल्या शेतकऱ्याची आत्महत्या
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अडीच एकरातील पीक हत्तींनी तुडवलं, वर्षभराच्या मेहनतीची राखरांगोळी
नैराश्यात गेलेल्या शेतकऱ्याची आत्महत्या
गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील देलोडा बु. येथे रानटी हत्तींच्या हल्ल्यामुळे उध्वस्त झालेल्या पिकामुळे मानसिक तणावात गेलेल्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खुशाल बैजू पदा (वय 55, रा. देलोडा बु.) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शनिवारी, 22 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास त्यांनी विष प्राशन करून जीवनयात्रा संपवली.
अडीच वर्षांच्या परिश्रमांतून पिकवलेले धान कापून बांधणी करून पुंजणे उभारून ठेवण्यात खुशाल पदा व्यस्त होते. मात्र, 18 नोव्हेंबरच्या रात्री रानटी हत्तींच्या कळपाने त्यांच्या शेतात अचानक प्रवेश केला आणि काही क्षणांत अडीच एकरातील संपूर्ण धानपिकाची नासधूस करून टाकली. झटपट उध्वस्त झालेल्या पिकामुळे खुशाल पदा यांच्यावर मोठं आर्थिक संकट ओढावलं.
आपल्या एकमेव उपजीविकेचा आधारच हातातून गेल्याने ते खोल नैराश्यात गेले. कुटुंबाचा खर्च कसा भागवायचा? घेतलेले कर्ज फेडायचे कसे? पुढचा हंगाम उभा करायचा कसा? या प्रश्नांनी त्रस्त होऊन पदा मानसिकरीत्या कोसळले. याच निराशेच्या भरात त्यांनी विष प्राशन केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
हेही वाचा : शाळेत गेलेल्या अल्पवयीन मुलीचं अपहरण करून सामूहिक बलात्कार! कुटुंबीय म्हणाले की...










