देवमाणूस मालिकेत अजून एक नवीन चेहरा, मालिकेला येणार आता वेगळं वळण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

झी मराठीवरील देवमाणूस या मालिकेतील विलक्षण वळण पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. ए. सी. पी. दिव्या सिंग भर लग्नाच्या मांडवातून देविसिंगची वरात थेट पोलीस स्टेशनकडे नेते. त्याला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल याकडे दिव्याचं लक्ष आहे पण अजितकुमार देखील हार मानणारा नाही आहे. अजितकुमार सध्या कोर्टात स्वतःची बाजू स्वतःच मांडतोय. दिव्या अजितकुमारच्या विरोधातले सगळे पुरावे कोर्टातच सादर करणार आहे अशात आता मालिकेत देवीसिंगला तुरुगांत धाडण्यासाठी सरकारी वकिल म्हणून आर्या देशमुख हिची मालिकेत एन्ट्री झाली आहे. हि वकील देविसिंगला खडी फोडायला पाठवण्यासाठी सज्ज आहे आणि त्यासाठी कोर्टात त्याच्यासोबत वादविवाद करताना दिसेल. अभिनेत्री सोनाली पाटील हि सरकारी वकिलाची भूमिका निभावत आहे. एवढंच नाही तर सोनाली पाटीलनं सोशल मीडियावरही काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना याबद्दल माहिती दिली आहे. तिनं कॅप्शनमध्ये म्हटलंय, ‘मी येतेय पुन्हा एका नव्या रूपात…’ आता हि सरकारी वकील देवीसिंगला शिक्षा करून देण्यात यशस्वी होईल कि ती देखील देविसिंगची शिकार होईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

ADVERTISEMENT

या नवीन भूमिकेबद्दल बोलताना सोनाली म्हणाली, “देवमाणूस या मालिकेत आता एक खूप मोठा ट्विस्ट आला आहे आणि अशावेळी माझी या मालिकेत एका महत्वाच्या भूमिकेतून एंट्री झाली आहे याचा मला खूप आनंद आहे. आर्या हि खूप धाडसी आणि महत्वाकांक्षी आहे. ती देवीसिंग प्रकरण कशाप्रकारे हाताळते हे पाहताना प्रेक्षकांना खूप मजा येईल.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT