कोरोना लस घेताना अनुपम खेर यांनी का केला देवाचा धावा?

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यात सध्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झालेली आहे. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अनुपम खेर यांनी देखील कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. दरम्यान ही लस घेताना अनुपम खेर यांनी इन्स्टाग्रावर एक गंमतीशीर व्हिडीयो शेअर केला आहे. या व्हिडीयोमध्ये भगवान शिव यांच्या नावाच जप करताना स्वतःला शांत करताना दिसतायत. यावेळी लस घेताना ते संपूर्ण वेळ ओम नमः शिवाय असं म्हणालेत. तर लसीकरण झाल्यानंतर अगदी लहानमुलाप्रमाणे खूशही झाले आहेत.

तर अनुपम खेर लसीकरणासाठी आईला देखील घेऊन गेले होते. हा व्हिडीयोमध्ये अनुपण खेर म्हणतात, माझी आई लस घेतेय आणि त्यातील हे काही मजेशीर गोष्टी. या व्हिडीयोच्या सुरुवातीला अनुपम यांची आई डॉक्टरांना मला अजिबात भीती वाटत नाही असं सांगताना दिसतेय. तर एका क्षणी अनुपमवर ओरडत त्यांना गप्प बसण्यास सांगितले होते. या दोघांची चर्चा ऐकून डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनाही हसू आवरत नाही.

तर अभिनेत्री नीना गुप्ता यांनी देखील करोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतलाय. नीना गुप्तां देखील लस घेतानाचा व्हिडीओ शेअर केलाय. यावेळी लस घेताना त्या काहीश्या घाबरल्याचं व्हिडीयोमध्ये दिसतंय.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

देशभरात लसीकरणाची मोहीम सुरु झाली असून अनेक बॉलिवूड कलाकारांनी लसीचा डोस घेतला आहे. नुकतंच परेश रावल यांनी देखील कोरोनाच्या लसीचा पहिला डोस घेत सोशल मिडीयावर फोटो शेअर केला होता. तर यापूर्वी कमल हसन, राकेश रोशन, जॉनी लिव्हर तसंच सैफ अली खान यांनीही लस घेतली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT