कोरोनाविरोधात लढण्यासाठी सर्वांनी एकत्र या…RRR सिनेमाच्या टीमचा खास संदेश

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोना व्हायरसने संपूर्ण देशाची परिस्थिती गंभीर झाली आहे. व्हायरसचा प्रसार अधिक होताना दिसत असून रूग्णांच्या संख्येत देखील वाढ होताना दिसतेय. अनेक ठिकाणी बेड्स तसंच ऑक्सिजनची कमतरता दिसून येतेय. अशा परिस्थिती सरकारकडून नागरिकांना मास्कचा वापर तसंच नियमांचं पालन करण्यास सांगण्यात येतंय. तर आता दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या आगामी सिनेमाच्या टीमने देखील नागरिकांमध्ये जनजागृती पसरवण्यासाठी पुढाकार घेतलाय.

ADVERTISEMENT

दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा आरआरआर या सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आरआरआर फिल्मचे कलाकार आणि दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या टीमने एक व्हिडीयो तयार करून कोरोना व्हायरसबाबत लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे.

या व्हिडीयोमध्ये अभिनेता अजय देवगण, राम चरण, बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि दिग्दर्शक एसएस राजमौली यांनी लोकांना कोरोनाविरोधातील या कठीण लढ्यात आपण सर्वांनी एकत्र येऊन संसर्गाची साखळी तोडण्याचं आवाहन केलंय. त्याचप्रमाणे मास्क, सॅनिटायझर आणि नियमांचं पालन करण्यास देखील आरआरआर सिनेमाच्या टीमकडून सांगण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

सध्या आरआरआर सिनेमाच्या या टीमचा व्हिडीयो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीयोमध्ये कलाकारांनी हिंदी, तेलगू, तमिळ, मल्ल्याळम तसंच कन्नड भाषेतून नागरिकांना आवाहन केलंय.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT