बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेचे ८०० भाग पूर्ण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गेलं दोन वर्ष महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार्‍या “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” ही आपली लाडकी मालिका पूर्ण करतेय ८०० भागांचा यशस्वी टप्पा. संत बाळूमामा यांच्या जीवनावर आधारित “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” ही मालिका कलर्स मराठीवर तुफान गाजते आहे. या मालिकेमुळे संत बाळूमामा हे आता केवळ दक्षिण महाराष्ट्राचं दैवत नव्हे तर तमाम महाराष्ट्राचं श्रध्दास्थान बनलं आहे. अवघा महाराष्ट्र “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” या जयघोषाने दुमदुमला. या मालिकेला पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. संत देवतावतारी बाळूमामा या नावच एक वेगळंच वलय आहे.. याच थोर संताची कथा कलर्स मराठी वाहिनीच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रासमोर मांडण्याचं शिवधनुष्य उचललं संतोष अयाचित यांनी… कलाकार आणि तंत्रज्ञांच्या मेहनतीने, तसचं प्रेक्षकांच्या प्रेमाने हे शिवधनुष्य ८०० भागांपर्यंत समर्थपणे पेललंसुद्धा. अगदी पहिल्या भागापासून ते आतापर्यंत लोकप्रियतेच्या शिखरावर रहाण सोपे नाही. यामध्ये संपूर्ण टीमचा मोलाचा वाटा आहे. मालिकेतील कलाकार, तंत्रज्ञ, मंडळी ज्यांनी बाळूमामांचा जीवन प्रवास सत्यात उतरविण्यासाठी जिवापाड मेहनत घेत आहेत.

ADVERTISEMENT

बाळूमामांच्या चरित्रगंथातील मामांच्या लीला, त्यांनी ज्या भक्तांचा उध्दार केला अश्या कथा आजावर आपण मालिकेत पाहिल्या. अश्याच अजुन सुरस कथा मालिकेच्या माध्यामातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT