Gadar 2 : सनी देओलचा डंका… मोडले रेकॉर्ड्स, गदरने किती कोटी कमावले?
Gadar 2, directed by Anil Sharma, has created history at the box office. Movie has collected 400.70 crores in 12 days. Gadar 2, which became Sunny Deol’s first 400 crore film, is blowing thunder with every day’s collection.
ADVERTISEMENT
Gadar 2 Box Office Collection Day 12 : कोरोना लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या बॉलिवूडने पुन्हा मुसंडी मारलीये. बॉक्स ऑफिसवर जबरदस्त पुनरागमन केले आहे. 2023 मध्ये पठाणसोबत सुरू झालेली बॉक्स ऑफिसवरील यशाची ही मालिका अजूनही सुरू आहे. बॉलिवूडचे चांगले दिवस परत आले आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीच्या चाहत्यांचा आनंद सातव्या आसमानावर आहे. ऑगस्टमध्ये बॉलिवूड चित्रपट धुमाकूळ घालत आहे आणि यामध्ये सर्वात मोठे योगदान आहे सनी देओलचा चित्रपट गदर 2 चे. बॉक्स ऑफिसवर या जबरदस्त कमाईने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
ADVERTISEMENT
गदर 2 ने 12व्या दिवशी किती कमाई केली?
कुणीही विचार केला नसेल की, 22 वर्षांनंतर परतल्यावर तारा सिंहला इतकं प्रेम मिळेल. अनिल शर्मा दिग्दर्शित गदर 2 ने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. या चित्रपटाने 12 दिवसांत 400.70 कोटींचा गल्ला जमवला आहे. गदर 2 हा सनी देओलचा पहिला 400 कोटी कमावणारा चित्रपट बनला आहे. हा चित्रपट दररोजच्या कलेक्शनसह बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
वाचा >> Sunny Deol च्या बंगल्याचा नेमका वाद काय? लिलावाबाबत सर्व काही जाणून घ्या
ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्शच्या म्हणण्यानुसार, सनी देओलच्या सिनेमाने मंगळवारी जवळपास 12.10 कोटींची कमाई केली आहे. गदर 2 ने भारतात 400.70 कोटी जमा केले आहेत. दुसऱ्या मंगळवारी चित्रपटाच्या कमाईत थोडीशी घसरण नक्कीच झाली आहे, तरीही चित्रपट धमाल करत आहे. गदर 2 ने वीकेंड बरोबरच वीकडेज मध्येही चांगला प्रेक्षक वर्ग खेचला आहे.
हे वाचलं का?
गदर २ ची पठाणला टक्कर
गदर 2 पूर्वी पठाण हा झटपट 400 कोटींची कमाई करणारा हिंदी चित्रपट होता. आता गदर 2 ने पठाणच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. दोन्ही चित्रपटांनी 12 दिवसांत 400 कोटींची कमाई केली आहे. दुसरीकडे, बाहुबली 2 (हिंदी) ने 14 दिवसांत 400 कोटी क्लबमध्ये एंट्री घेतली होती. KGF 2 (हिंदी) ने 23 व्या दिवशी 400 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला होता. दुसरीकडे, सनी देओलच्या या चित्रपटाने जगभरात 500 कोटींची कमाई केली आहे.
सनी देओच्या चित्रपटाची जादू लोकांना वेड लावणारी आहे. गदर 2 ने कमाईत अनेक मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटांना मागे टाकले आहे. सनीचा चित्रपट शाहरुख खानच्या ‘पठाण’ला टक्कर देत आहे. गदर 2 ज्या वेगाने कमाई करत आहे ते पाहता अजून बरेच विक्रम मोडेल असं म्हटलं जात आहे.
ADVERTISEMENT
सनी देओलचे चाहत्यांना वेड
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही सनी देओल आणि अमिषा पटेल प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. परदेशातही गदर २ ची चाहत्यांमध्ये क्रेझ आहे. तिथेही हिंदुस्थान झिंदाबादच्या घोषणा लोक देताना दिसताहेत. लोकांचे असे प्रेम पाहून सनी देओलही आश्चर्यचकित झाला.
ADVERTISEMENT
वाचा >> Akshay Kumar :अक्षय कुमार भारतीय झाला,आता निवडणूक लढवणार?
एका मुलाखतीत त्याने सांगितले की, त्याला स्वतःला माहित नव्हते की, लोक अजूनही त्याच्यावर इतके प्रेम करतात. सनीचा गदर २ सुपरहिट झाल्यापासून निर्माते त्याच्या यशाचे फायदा घेण्यात व्यस्त आहे. सनीच्या या चित्रपटाचा सिक्वेल येणार असल्याच्या बातम्याही येत आहेत. सनी देओलने अद्याप कोणताही नवीन प्रोजेक्ट साइन केलेला नाही.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT