पती समीर वानखेडेंना टार्गेट करणाऱ्यांना क्रांती रेडकरने दिलं प्रत्युत्तर; म्हणाली…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर तिच्या अभिनयाने नेहमी प्रेक्षकांची पसंती मिळवते. तिच्या चित्रपटांमुळे आणि सोशल मीडियावरील पोस्टमुळे ती चर्चेत असते. क्रांतीचे पती एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे आहेत. सध्या समीर हे शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याच्या ड्रग्स प्रकरणामुळे चर्चेत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सर्व टिमने मुंबईतील क्रूझवरील ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला.

ADVERTISEMENT

समीर वानखेंडेंवर आता या प्रकरणामुळे चहूबाजूंनी टीका होत आहे. अनेक जण सध्या समीर वानखेंडेंना टारगेट करत आहेत. मात्र आता समीर वानखेडेंची बायको आणि अभिनेत्री क्रांती रेडकरने आपल्या पतीविरोधात होत असलेल्या टीकेवर उत्तर दिलं आहे. क्रांतीने ट्वीट करत समीर वानखेंडेंना आपला भक्कम पाठिंबा असल्याचं सांगितलं आहे.

क्रांतीने ट्वीट करत म्हटलं आहे की जेव्हा तुम्ही लाटांविरोधात पोहता, तेव्हा बुडण्याची शक्यता जास्त असते. पण जेव्हा देव तुमच्या सोबत असतो तेव्हा या जगातली कुठलीही लाट मग ती किती ही प्रचंड असो तुम्हाला बुडवू शकत नाही. कारण तो तुमच्या मागे उभा आहे. तो सत्यासोबत आहे. क्रांतीने ट्वीटमध्ये म्हटलं आहे की देव सोबत असल्यावर कुठलीही लाट तुम्हांला बुडवू शकत नाही. समीर वानखेडे आपलं काम करत आहेत. आणि देव त्यांच्यासोबत आहे आणि त्यांच्यामागे भक्कमपणे उभा आहे.

हे वाचलं का?

याच्याआधी काही दिवसांपूर्वी क्रांतीनं समीर यांचा प्रचंड अभिमान वाटतो, असं सांगितलं होतं. ते प्रथम देशाचे आहेत मग आमचे,असंही क्रांती म्हणाली होती. इतकंच नव्हे तर त्यांची काळजी वाटते पण त्यांना पूर्ण पाठिंबा असून कोणत्याही परिस्थीतीत त्यांना सहकार्य करण्याची तयारी असल्याचंही क्रांती रेडकर म्हणाली होती.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT