Kritika Malik : "मी स्पोर्टस् ब्रा आणि...", कृतिका मुनव्वर फारूकीवर भडकली
Kritika Malik Munawar Faruqui : बिग बॉस ओटीटी 3 मध्ये कृतिका मलिकच्या कपड्यांबद्दल जास्त चर्चा झाली. मुनव्वर फारूकीनेही कमेंट केली होती. त्याला कृतिकाने उत्तर दिले.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
कृतिका मलिक मुनव्वर फारूकीवर का भडकली?
टाईट कपड्यांबद्दल कृतिकाने काय दिलं उत्तर?
कृतिका मलिक तिच्या कपड्यांमुळे राहिली चर्चेत
Kritika Malik Bigg Boss OTT 3 : बिग बॉस ओटीटी 3 ची विजेती सना मकबूल ठरली. पण, या सीझनमध्ये कृतिका मलिक चांगलीच चर्चेत राहिली. बिग बॉस ओटीटीच्या घरात पती अरमान मलिक आणि सवत पायल मलिकसोबत कृतिका बराच काळ राहिली. तिच्या कपड्यांचीही चर्चा झाली. बिग बॉस घरातून बाहेर आल्यानंतर कृतिकाने उत्तर दिले. (kritika malik reaction on Munawar faruqui tight clothes comment)
ADVERTISEMENT
कृतिका मलिकच्या टाईट कपड्यांबद्दल मुनव्वर फारूकीने कमेंट केली होती. त्यावरही कृतिका बोलली आहे.
कृतिका मलिक मुनव्वर फारूकीच्या कमेंटवर म्हणाली...
"मला मुनव्वर फारूकीच्या सर्व गोष्टी चांगल्या वाटल्या. पण, ही गोष्ट समजली नाही की, मी टाईट कपडे घालते. तुम्ही जिमला सलवार सूट घालून जाणार का? मी जिमचे कपडे घातलेले होते. जे सगळेच घालतात. मी चुकीचे कपडे घातलेले नव्हते. मी स्पोर्ट्स ब्रा आणि टाईट कपडे घातलेले होते. ते प्रत्येक मुलगी घातले. मी काही वेगळी नाहीये."
हे वाचलं का?
हेही वाचा >> लेकीसोबत एअरपोर्टवर झाली स्पॉट, घटस्फोटाच्या चर्चांवर ऐश्वर्या काय म्हणाली?
कृतिकाने विशाललाही दिले उत्तर
विशालच्या कमेंटबद्दल कृतिका म्हणाली की, "तू चांगला दिसत आहे, हे शो मध्ये एकमेकांना बोलणे सामान्य बाब आहे. मी पण सना, नॅझी भाईला बोलायचे की तुम्ही चांगले दिसत आहात. पण, तुम्ही जेव्हा कुणाच्या तरी कानात बोलता आणि दुसरा व्यक्ती बोलत असेल की, चुकीचे बोलत आहे. नंतर तो व्यक्ती पलटी मारतो, तर तो त्यांचा प्रश्न आहे."
हेही वाचा >> सेल्फीचा नाद पडला भारी! पुण्यातील तरुणी कोसळली दरीत, व्हिडीओ बघा
अरमान मलिकची दुसरी पत्नी कृतिका मलिक म्हणाली की, "जेव्हा समोर म्हणतोय की, वाईट हेतून बोलला आहे. तर मग ते चुकीचेच आहे. मी बरोबर केले."
ADVERTISEMENT
लव कटारियाच्या कमेंटमुळे वाद निर्माण झाला होता. लव कटारियाने कृतिका मलिकला गार्डन एरियामध्ये बघितल्यावर तू सुंदर दिसतेस आणि भाऊ खूप भाग्यवान आहे, असे म्हटले होते. त्यानंतर अरमान मलिकने त्याच्या कानशिलात मारली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT