Aishwarya Rai : लेकीसोबत एअरपोर्टवर झाली स्पॉट, घटस्फोटाच्या चर्चांवर ऐश्वर्या काय म्हणाली?
Aishwarya Rai Abhishek Bachchan Divorce Rumour : गेल्या अनेक आठवड्यांपासून बॉलिवूडमध्ये अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत. यामागच कारण म्हणजे मध्यंतरी अभिषेक बच्चनने घटस्फोटाची एक पोस्ट लाईक केली होती. या पोस्टनंतर अभिषेक ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले होते.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
ऐश्वर्या राय आणि आराध्या न्युयॉर्कवरून मायदेशात परतल्या आहेत.
10 ते 15 दिवसापासून दोघीही न्युयॉकमध्ये वेकेशनवर होत्या.
ऐश्वर्या रायने घटस्फोटाच्या चर्चांवर पहिली प्रतिक्रिया दिली
Aishwarya Rai Abhishek Bachchan Divorce Rumour : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय तिची मुलगी आराध्या बच्चन या न्युयॉर्कवरून मायदेशात परतल्या आहेत. गेल्या 10 ते 15 दिवसापासून दोघीही न्युयॉकमध्ये वेकेशनवर होत्या. या दरम्यान बॉलिवूडमध्ये अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या रायच्या (Aishwarya Bachchan) घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे आता मायदेशात परतल्यानंतर एअरपोर्टवर उतरताच ऐश्वर्या रायने घटस्फोटाच्या चर्चांवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे नेमकी ती काय म्हणाली आहे? हे जाणून घेऊयात. (aishwarya rai bachchan and aaradhya bachchan reach mumbai airpost react on divorce rumour abhishek bachchan)
ADVERTISEMENT
गेल्या अनेक आठवड्यांपासून बॉलिवूडमध्ये अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत. यामागच कारण म्हणजे मध्यंतरी अभिषेक बच्चनने घटस्फोटाची एक पोस्ट लाईक केली होती. या पोस्टनंतर अभिषेक ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले होते.
'त्या' पोस्टमध्ये काय?
'घटस्फोट कुणासाठीही सोपा नसतो. आनंदाने जगण्याचे स्वप्न कोण पाहत नाही किंवा रस्ता ओलांडताना एका वृद्ध जोडप्याचा हात धरून तो हृदयस्पर्शी व्हिडिओ पुन्हा बनवायचा आहे? तरीही कधी कधी आयुष्य आपल्या अपेक्षेप्रमाणे नसते,पण अनेक दशके एकत्र घालवल्यानंतर जेव्हा लोक वेगळे होतात, तेव्हा त्यांच्या आयुष्याचा मोठा भाग लहान-मोठ्या दोन्ही गोष्टींसाठी एकमेकांवर अवलंबून असताना ते कसे सहन करतात? त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागेल?
हे वाचलं का?
हे ही वाचा : Satara Crime : प्रेयसीला आधी घरात बोलावलं, नंतर बिल्डिंगवरुन खाली ढकललं..., प्रियकराने का केली हत्या?
अभिषेक बच्चनने ही पोस्ट लाईक केली. ज्यानंतर लोक आता याला त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी जोडून पाहत आहेत. त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दरम्यान या घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना ऐश्वर्या राय मल्ुलगी आराध्या बच्चनसोबत न्युयॉर्कला वेकेशनवर गेली होती. आता ती वेकेशनवरून परतल्यानतर तिने घटस्फोटावर भाष्य केलं आहे.
ADVERTISEMENT
खरं तर ऐश्वर्या आणि आराध्या मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाला होत्या. यावेळी पापाराझींनी त्यांना फोटोसाठी थांबवलं होतं. फोटो काढून झाल्यानंतर पॅप्सनी ऐश्वर्याला गुड मॉर्निग ग्रीड केलं. आणि मॅम तुम्ही कशा आहात? असा प्रश्न केला. या प्रश्वावर ऐश्वर्या हसली आणि तिने सगळं काही ठीक आहे. धन्यवाद, अशी प्रतिक्रिया दिली.
ADVERTISEMENT
ऐश्वर्याच्या या प्रतिक्रियेनंतर आता खरंच दोघांमध्ये घटस्फोट होणार आहे की, या नुसत्या अफवा आहेत, अशी चर्चा आता सुरु झाली आहे. दरम्यान 20 एप्रिल 2007 रोजी अभिषेक आणि ऐश्वर्या विवाहबंधनात अडकले होते. 2011 मध्ये या जोडप्याने त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले. आता दोघांच्या लग्नाला 17 वर्ष पुर्ण झाली आहेत. त्यानंतर दोघेही विभक्त होणार असल्याची चर्चा सुरू आहे.
हे ही वाचा : Narayan Rane : ''मातोश्री'त बसून धमकीची भाषा करणारे...', ठाकरेंवर राणे कडाडले!
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT