Satara Crime : प्रेयसीला आधी घरात बोलावलं, नंतर बिल्डिंगवरुन खाली ढकललं..., प्रियकराने का केली हत्या?

मुंबई तक

ADVERTISEMENT

satara crime story boy fried  pushed his girl friend from third floor shocking crime story from karad
प्रियकराने (Boy Friend) प्रेयसीला (Girl Friend) का संपवलं?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आरूषी मिश्रा ही मुळची बिहारची रहिवाशी होती.

point

कराडमधील कृष्णा मेडिकल कालेजमध्ये ती शिकत होती.

point

दोघेही साधारण दोन-तीन वर्षापासून एकमेकांना ओळखायचे.

Satara Crime News : सातारा जिल्ह्यातील कराडमधून (Karad) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत प्रियकराने प्रेयसीला घरात बोलावून तिला बिल्डिंगमधून खाली ढकलून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. आरूषी मिश्रा असे या मृत प्रेयसीचे नाव आहे. या घटनेने शहरात खळबळ माजली आहे. पण प्रियकराने (Boy Friend) प्रेयसीला   (Girl Friend) का संपवलं? तिच्या हत्ये मागची खरी कहाणी काय आहे? हे जाणून घेऊयात. (satara crime story boy fried  pushed his girl friend from third floor shocking crime story from karad)  

मिळालेल्या माहितीनुसार, मृत आरूषी मिश्रा ही मुळची बिहारची रहिवाशी होती. आणि कराडमधील कृष्णा मेडिकल कालेजच्या पहिल्या वर्षात ती शिकत होती. आरोपी प्रियकर देखील तिच्यासोबत याच कॉलेजमध्ये शिकत होता. दोघेही साधारण दोन-तीन वर्षापासून एकमेकांना ओळखायचे. त्यामुळे दोघांची चांगली मैत्री होती आणि दोघेही नात्यात असल्याची माहिती आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉलेजच्या जवळच असलेल्या सनसिटी इमारतीमध्ये आरोपी राहत होता. घटनेच्या दिवशी आरोपी प्रियकराने आरुषीला घरी बोलावलं होतं. घरी बोलावल्यानंतर दोघांमध्ये वाद सुरु झाला. त्याचं झालं असं की प्रियकर ध्रुव छिक्करने आरूषीच्या प्रेमावर संशय घेतला होता. 'तुझं दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध आहेत', असा संशय ध्रुवने आरूषीवर घेतला होता. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Manoj jarange : 'फडणवीसांना मला...', कोर्टातून बाहेर पडताच जरांगे पुन्हा संतापले!

या संशयानंतर दोघांमध्ये वादावादीला सुरूवात झाली होती. दोघांमध्ये यावेळी झटापटही झाल्याची माहिती आहे. या झटापटीत ध्रुवने घरातून आरूषीला खाली ढकलून दिलं होतं. त्यामुळे बिल्डिंगवरून खाली पडून आरूषीचा जागीच मृत्यू झाला होता. 

दरम्यान दोघांमध्ये वाद झाल्यानंतर ध्रुव देखील जखमी झाला होता. या वादात त्याचा पाय मोडल्याची माहिती आहे. त्यामुळे त्याच्यावर रुग्णालयात उपचार सूरू असल्याची माहिती आहे. या प्रकरणी आता आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली आहे. 

ADVERTISEMENT

या घटनेबाबत आरुषी मिश्राची आईला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांचे फ्लॅटवर भांडण झाले त्यानंतर दोघांमध्ये धक्काबुक्की झाली, या धक्काबुक्कीनंतर मुलाने आरूषीला खाली ढकललं होतं. आमची मुलगी आरुषी पहिल्यापासून अभ्यासात खूप हूशार होती. त्यामुळे मुलगा तिच्या बुद्धिमतेवर जळायचा. याआधी देखील या दोघांमध्ये वाद झाला होता. पण आता माझ्या मुलीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तिला न्याय मिळाला पाहिजे,अशी मागणी आरूषीच्या आईने केली आहे. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Narayan Rane : ''मातोश्री'त बसून धमकीची भाषा करणारे...', ठाकरेंवर राणे कडाडले!

दरम्यान या घटनेने शहरात खळबळ माजली आहे. तसेच या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT