रावरंभा चित्रपटात कुशल बद्रिके पहिल्यांदाच दिसणार खलनायकाच्या भूमिकेत!
आपल्या विनोदी कौशल्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा हास्यकलाकार अभिनेता कुशल बद्रिके आता एका नव्या भूमिकेत झळकणार आहे.‘रावरंभा’ या ऐतिहासिक चित्रपटात तो क्रूरकर्मा ‘कुरबतखान’ या दमदार व्यक्तिरेखेत दिसेल.
ADVERTISEMENT
Kushal Badrike : आपल्या विनोदी कौशल्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा हास्यकलाकार अभिनेता कुशल बद्रिके आता एका नव्या भूमिकेत झळकणार आहे. विनोदाच्या अफलातून टायमिंगने प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारा कुशल वेगळ्या रूपात प्रेक्षकांना दिसेल. त्याचं हे रूप भल्याभल्यांना धडकी भरवणार आहे. ‘रावरंभा’ या ऐतिहासिक चित्रपटात तो क्रूरकर्मा ‘कुरबतखान’ या दमदार व्यक्तिरेखेत झळकणार आहे. विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकल्यानंतर कुशल प्रथमच ऐतिहसिक आणि खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. (Kushal Badrike played the role of the villain in the Ravrambha movie Will release on 12th may)
ADVERTISEMENT
येत्या 12 मे रोजी इतिहासातील हे ‘मोरपंखी पान’ पडद्यावर रसिकांसमोर उलगडणार आहे. निर्माते शशिकांत शीला भाऊसाहेब पवार आणि दिग्दर्शक अनुप जगदाळे ‘रावरंभा’ ही प्रेमकहाणी प्रेक्षकांसमोर आणणार आहेत.
‘त्यांचा राम…’, ठाण्यात बाळासाहेब थोरातांनी एकनाथ शिंदेंवर चढवला हल्ला
12 मे पासून चित्रपटगृहांमध्ये ‘रावरंभा’ ही ऐतिहासिक प्रेमकहाणी पाहायला मिळणार आहे.बहलोलखानचा वफादार आणि शाही सल्तनतीचा राखणदार असलेला ‘कुरबतखान’ हा विजापूरचा क्रूर हेर होता. ‘बघणाऱ्याला चीड येईल अशी ही भूमिका साकारणं हे खरंतर माझ्यातल्या अभिनेत्यासाठी आव्हानात्मक होतं. त्यामुळे दिसण्यातला वेगळेपणा आणि लकबी आत्मसात करून ही भूमिका मी साकारलीय. प्रेक्षकांच्या ती पसंतीस पडेल, अशी मला खात्री आहे’, असं कुशल सांगतो.
हे वाचलं का?
मालवणीची दंगल पूर्वनियोजित, आधी कट नंतर…; पोलिसांच्या तपासात खळबळजनक माहिती
शशिकांत पवार प्रोडक्शन निर्मित ‘रावरंभा’ चित्रपटाची पटकथा आणि संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत. छायांकन संजय जाधव तर संकलन फैजल महाडिक यांचे आहे. सहनिर्माते अजित भोसले आणि संजय जगदाळे आहेत तर कार्यकारी निर्माते महेश भारांबे, अन्वय नायकोडी आहेत. गुरु ठाकूर आणि क्षितीज पटवर्धन यांनी लिहिलेल्या गीतांना अमितराज यांनी संगीत दिले आहे. पार्श्वसंगीत आदित्य बेडेकर यांचे आहे. वेशभूषा पौर्णिमा ओक, रंगभूषा प्रताप बोऱ्हाडे, कलादिग्दर्शन वासू पाटील यांचे आहे. साहसदृश्ये शेवोलिन मलेश यांची आहेत.
व्हीएफएक्सची जबाबदारी वॉट स्टुडिओ आणि जयेश मलकापूरे यांनी सांभाळली आहे. ध्वनीसंकलन दिनेश उच्चील, शंतनू अकेरकर यांचे आहे. प्रशांत नलवडे निर्मिती व्यवस्थापक आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT