Adipurush : सिनेमातील ‘या’ संवादामुळे ‘आदिपुरुष’ वादात! काय आहेत डॉयलॉग ?
आदिपुरूष सिनेमातील संवाद प्रसिद्ध लेखक मनोज मुंतशीर यांनी लिहले आहेत. मनोज मुंतशीर यांनी हे संवाद बदलण्याचे आश्वासन दिल्यानंतरही विरोध शमला नाही. त्यामुळे मनोज मुंतशीर यांनी स्वत:ला धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे. तसेच मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे.
ADVERTISEMENT
दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) यांच्या आदिपुरूष (Adipurush) सिनेमावरून देशभरात मोठा वाद पेटला आहे. या सिनेमातील संवादाला देशभरातून विरोध करण्यात येत आहे. या चित्रपटाचे संवाद प्रसिद्ध लेखक मनोज मुंतशीर (manoj muntashir) यांनी लिहले आहेत. मनोज मुंतशीर यांनी हे संवाद बदलण्याचे आश्वासन दिल्यानंतरही विरोध शमला नाही. त्यामुळे मनोज मुंतशीर यांनी स्वत:च्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे.यासाठी त्यांनी मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे. दरम्यान आता आदिपुरूष सिनेमाला वादात टाकणारे ते डायलॉग कोणते आहेत, हे जाणून घेऊय़ात.(what is the that dialogue who creates adipurush movie controversy manoj muntashir prabhas saif ali khan)
ADVERTISEMENT
सिनेमातील डॉयलॉग
हनुमान ज्यावेळेस लंकेत जातो, त्यावेळेस राक्षस त्याला पाहून विचारतो, ‘ये लंका क्या तेरी बुआ का बगीचा है, जो हवा खाने चला आया.”
सीतेला भेटल्यानंतर हनुमानाला लंकेत राक्षस पकडतात, त्यावेळेस मेघनाथ हनुमानाच्या शेपटीला आग लावून विचारतो जली. यावर हनुमान उत्तर देतो, ”तेल तेरे बाप का. कपडा तेरे बाप का. और जलेगी भी तेरे बाप की.”
हे वाचलं का?
हे ही वाचा : Adipurush चित्रपटामुळे लोक का चिडलेत? या व्हायरल Memes मध्ये दडलंय उत्तर
हनुमान लंकेवरून ज्यावेळेस परतात त्यावेळेस राम त्याला विचारतो काय झालं? यावेळी हनुमान सांगतो की, ”बोल दिया, जो हमारी बहनों को हाथ लगाएंगे, उनकी लंका लगा देंगे.”
लक्ष्मणावर वार केल्यानंतर इंद्रजीत बोलतो, ”मेरे एक सपोले ने तुम्हारे इस शेष नाग को लंबा कर दिया. अभी तो पूरा पिटारा भरा पडा है.”
ADVERTISEMENT
आदिपुरूष सिनेमातील या डायलॉगवर प्रेक्षकांनी आक्षेप घेतला होता.प्रभास, कृति सेनन आणि सैफ अली खान स्टारर आदिपुरूष सिनेमा शुक्रवारी 16 जून रोजी रीलीज झाला होता. या रिलीजनंतर सिनेमाला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते. आदिपुरूषच्या डायलॉग, व्हिएफएक्स, पात्रांचे कपडे आणि रावणाचा अवतार यावरून सिनेमावर टीका करण्यात आली होती. या टीकेनंतर आता या सिनेमाला देशभरातून विरोध होत आहे.
ADVERTISEMENT
मनोज मुंतशीर काय म्हणाले?
हॉलिवूडमधील कलाकारांची पात्र मुलांच्या हृदयावर राज्य करतात. लहान मुले हल्क आणि सुपरमॅनला ओळखतात, पण हनुमान आणि अंगदला ओळखत नाही. त्यामुळे आमचा प्रयत्न आहे की, आमची पात्र, सनातन कथा आणि भगवान रामाची कथा लहान मुलांपर्यंत पोहोचवावी हे सिनेमाचे मुख्य लक्ष्य आहे,असे मनोज मुंतशीर म्हणाले आहेत.
सिनेमाच्या डायलॉगशी लहान मुले कनेक्ट होतील व त्यांना समझतील यासाठी असे डायलॉग लिहल्याचे मनोज मुंतशीर यांनी सांगितले. एक सिनेमा 4000 डायलॉगने बनतो. त्यामुळे जर 5 डायलॉग आवड़ले नसतील तर इतर 3995 डायलॉग नक्कीच आवडले असतील. 4000 हजारमधून 5 डायलॉग बदलायला काहीच नाही. जे आक्षेपार्ह शब्द आहे, ज्यामुळे जनतेने मन दुखावले आहे, ते बदलून टाकू, असे देखील मनोज मुंतशीर म्हणाले आहे.
हे ही वाचा : Adipurush Collection : निर्मात्यांवर टीकेचा भडीमार, पण आदिपुरुषने केली मोठी कमाई केली?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT