बुरा ना मानो होली है! रंगपंचमीच्या आठवणीत रमले मराठी सेलिब्रिटी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

देशावर कोरोनाचं संकट आहे. मात्र तरीही होळी तसंच रंगपंचमीच्या उत्साह कमी झालेला दिसला नाही. अनेक बॉलिवूड कलाकरांनी रंगपंचमीचा आनंद लुटला आहे. तर यामध्ये मराठी कलाकारही मागे राहिलेले नाहीत. यंदा कोरोनाच्या संकटामुळे काहींनी घरीच होळी साजरी केलीये. तर अनेकांनी रंगपंचमीचे जुने फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.

ADVERTISEMENT

मराठी अभिनेत्री उर्मिला कानेटकरने तिची चिमुकली मुलगी जिजा हिच्यासोबत होळीचा आनंद लुटला आहे. उर्मिलाने सोशल मिडीयावर व्हिडीयो शेअर केलाय ज्यामध्ये जिजा आपल्या आईला अगदी आनंदाने रंग लावताना दिसतेय.

हे वाचलं का?

अभिनेत्री प्रार्थना बेहरेने देखील घरीच कुटुंबासोबत रंगपंचमीचा आनंद लुटला आहे. यासोबत तिने ‘बुरा ना मानो होली है !!!!!’ असं कॅप्शनही दिलंय.

कोरोनाचे रूग्ण वाढत असताना काही मराठी कलाकारांनी रंगपंचमी खेळणं टाळलं आहे. मात्र यावेळी त्यांनी जुने फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने 3 वर्षांपूर्वीचा मितालीसोबतचा फोटो शेअर केलाय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने ‘यावेळी घरीच होळी साजरी करूया’ असं म्हटलंय.

ADVERTISEMENT

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरप्रमाणे संस्कृती बालगुडे हिनेही जुना फोटो शेअर करत रंगपंचमीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

ADVERTISEMENT

मराठमोळी अभिनेत्री माधुरी दिक्षीतनेही पतीसोबतचा जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. इतकंच नाही तर माधुरीने, यावेळी सर्वांनी जुने फोटो शेअर करत एका वेगळ्या पद्दधतीने रंगपंचमी साजरी करण्याचं सर्वांना आवाहन केलंय.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT