भरपूर अॅक्शनने भरलेला ‘मुंबई सागा’चा टीझर पाहिलात का?
नुकतंच अभिनेता इम्रान हाश्मी याचा चेहरे हा सिनेमा 30 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. तर इम्रानचा अजून सिनेमा मुंबई सागाही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जॉन अब्राहम आणि इम्रान हाश्मी स्टारर असलेल्या या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. टीझर पाहिल्यानंतर सिनेमा रिलीज कधी होणार याकडे आता प्रेक्षकांचं लक्ष लागलंय. View this post on Instagram A […]
ADVERTISEMENT
नुकतंच अभिनेता इम्रान हाश्मी याचा चेहरे हा सिनेमा 30 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. तर इम्रानचा अजून सिनेमा मुंबई सागाही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जॉन अब्राहम आणि इम्रान हाश्मी स्टारर असलेल्या या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. टीझर पाहिल्यानंतर सिनेमा रिलीज कधी होणार याकडे आता प्रेक्षकांचं लक्ष लागलंय.
ADVERTISEMENT
मुंबई सागा सिनेमाच्या टीझरमध्ये अॅक्शन सीन दाखवण्यात आले आहेत. अभिनेता जॉन अब्राहम एका अंडरवर्ल्ड गुंड्याची भूमिका साकारणार आहे. तर इम्रान हाश्मी पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहे. मुंबई सागा हा सिनेमा 19 मार्च रोजी रिलीज करण्यात येणार आहे. हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक फार उत्सुक आहेत.
दरम्यान या सिनेमात जॉन अब्राहम आणि इम्रान हाश्मीसोबत महेश मांजरेकर आणि सुनिल शेट्टी देखील झळकणार आहे. याशिवाय अभिनेत्री काजल अग्रवालही मुख्य भूमिका साकारणार आहे. तर संजय गुप्ता यांनी सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे.
हे वाचलं का?
जॉन अब्राहम सध्या ‘अटॅक’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याने नुकतंच सत्यमेव जयते 2चं शूटिंग पूर्ण केले आहे. हा सिनेमा ईदच्या निमित्ताने 12 मे रोजीला प्रदर्शित होणारे. शिवाय अभिनेता इमरान हाश्मी चेहरे या चित्रपटात दिसणार आहे. मंगळवारीच चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT