रात्रीस खेळ चाले: शेवंता पुन्हा नाईकांच्या वाड्यावर!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

झी मराठीवरील मालिका ‘रात्रीस खेळ चाले’मधील शेवंता ही पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.

रात्रीस खेळ चाले मालिकेच्या दुसऱ्या सीजनमध्ये शेवंताची भूमिका साकारणाऱ्या अपूर्वा नेमळेकर हिने प्रेक्षकांना अक्षरश: वेडावून सोडलं होतं.

हे वाचलं का?

रात्रीस खेळ चाले मालिकेत शेवंता या भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं होतं.

आता पुन्हा एकदा रात्रीस खेळ चाले मालिकेचा तिसरा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ज्यामध्ये शेवंताचं देखील पुनरागमन झालं आहे.

ADVERTISEMENT

2011 साली ‘आभास हा’ या झी मराठीवरील मालिकेतूनच अपूर्वाने आपला छोट्या पडद्यावरील प्रवास सुरु केला होता.

ADVERTISEMENT

यानंतर अपूर्वाने भाखरखाडी, 7 किमी, इश्क वाला लव्ह, व्हीला, द अॅक्सिडेन्टल प्राइम मिनिस्टर, सब कुशल मंगल यासारख्या हिंदी, मराठी सिनेमात अपूर्वाने काम केलं आहे.

चोरीचा मामला आणि आता इब्लिस या नाटकांमधून देखील अपूर्वाने काम केलं आहे.

मात्र, झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले या मालिकेतील शेवंताच्या भूमिकेने अपूर्वाला यशाच्या शिखरावर नेलं.

शेवंता भूमिकेसाठी झी मराठीने झी बेस्ट अॅक्ट्रेस हा पुरस्कार देखील अपूर्वाला बहाल केला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT