Pune: मंत्री मुरलीधर मोहोळांनी 'ती' पोस्ट शेअर करताच रोहित पवार संतापले, थेट सुनावलं!
Pune News : युद्धजन्य परिस्थितीत मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोशल मीडियावर मोदी सरकार हे काँग्रेसहून कसं श्रेष्ठ आहे. त्याच प्रमाणे काँग्रेसच्या तुलनेत दहशतवादाशी कसं सामना करतं अशी अशी पोस्ट त्यांनी केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून रोहित पवारांनी सध्याची परिस्थिती पाहता देशासोबत आपण खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. यावरून आपण राजकारण करू नये अशी थेट समज दिलीय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीवरून भाजपचे मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीय.

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त करत मोहोळांना थेटच सुनावलंय.

युद्धजन्य परिस्थितीत मुरलीधर मोहोळ राजरकारण करत आहेत असं बोललं जातंय.
Pune News : पुणे : भाजपचे मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोशल मीडियावर सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीवरून एक पोस्ट शेअर केलीय. सध्याची संवेदनशील परिस्थिती पाहता मुरलीधर मोहोळ यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत राजकारण केलं जात असल्याचं दिसत आहे. यावरून आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त करत मोहोळांना थेटच सुनावलंय.
मुरलीधर मोहोळांनी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचा उदो उदो केलाय. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एनडीएफ सरकारच्या कार्यकाळात ज्यावेळी दहशतवादी हल्ले करण्यात आले. त्यावेळी भारताकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. मात्र, काँग्रेस सरकार असताना असं झालं नाही, अशा अर्थाची पोस्ट मुरलीधर मोहोळांनी केलीय. यावरून आता रोहित पवारांनी प्रत्युत्तरात ही राजकारण करण्याची वेळ नसून देशासोबत मजबूत स्थितीत उभं राहण्याची वेळ असल्याचं पोस्टद्वारे प्रत्युत्तर दिलंय.
मुरलीधर मोहोळांची पोस्ट
पोस्टमध्ये एक तक्ता अधोरेखित करण्यात आलाय. ज्यात नमूद केलंय की, काँग्रेस सरकारच्या काळात 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट, दिल्ली साखळी बॉम्ब स्फोट 2005, तर मुंबईच्या 26/11 या दहशतवादी हल्ल्यात काँग्रेस कसं अपयशी झालं, अशी पोस्ट त्यांनी केलीय.
तर दुसऱ्या बाजूच्या तक्त्यात नरेंद्र मोदी सरकारच्या काळात पाकिस्तानचे हल्ले आणि सर्जिकल स्ट्राईक करण्यात कसं यश मिळवतंय, अशी पोस्ट तक्त्याद्वारे शेअर करण्यात आलीय. त्यावर आता रोहित पवारांनी प्रत्युत्तरात सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मोहोळांना खडे बोल सुनावलंय.