अशोक चव्हाणांना तगडा झटका, एकाच कुटुंबात 6 जणांना उमेदवारी देणं भोवलं, मतदारांकडून सुपडा साफ

मुंबई तक

Loha Nagarpalika Election Results : लोहा नगरपरिषद निवडणुकीत आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. नगराध्यक्षपदासह तब्बल 17 जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळवत भाजपचा धुव्वा उडवला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसला प्रत्येकी एकच जागा मिळाली असून भाजपच्या पारड्यात मात्र नामुष्की आली आहे.

ADVERTISEMENT

Loha Nagarpalika Election Results
Loha Nagarpalika Election Results
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भाजपने एकाच कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी दिली अन् सर्वच्या सर्व पराभूत झाले

point

घराणेशाहीचा सुपडा साफ

point

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना तगडा झटका

Loha Nagarpalika Election Results : “घराणेशाही संपवणार” असा आक्रमक दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाची लोहा नगरपरिषद निवडणुकीत भाजपची घराणेशाही पाहायला मिळाली होती. मात्र, नगरपालिका निवडणुकीत मतदारांनी घराणेशाहीचा धडा शिकवला आहे. भाजपकडून एकाच कुटुंबातील तब्बल सहा जणांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे ही निवडणूक केवळ राजकीय नाही तर नैतिकतेचीही कसोटी ठरली होती. मात्र निकालाने भाजपची ही रणनीती पूर्णपणे अपयशी ठरली असून सहाही उमेदवारांना मतदारांनी स्पष्ट नाकारलं आहे.

लोहा नगरपरिषद निवडणुकीत आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. नगराध्यक्षपदासह तब्बल 17 जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळवत भाजपचा धुव्वा उडवला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसला प्रत्येकी एकच जागा मिळाली असून भाजपच्या पारड्यात मात्र नामुष्की आली आहे.

हेही वाचा : CM फडणवीस स्वत: उतरले मैदानात अन् श्रीकांत शिंदेंच्या बालेकिल्ल्यात मारली मुसंडी, अंबरनाथ-बदलापुरात भाजपची सत्ता!

या निवडणुकीत भाजपने घराणेशाहीवर मोठा डाव खेळला होता. नगराध्यक्षपदासाठी गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्यात आली होती. याच कुटुंबातील इतर सदस्यांनाही विविध प्रभागांतून उमेदवारी देत भाजपने ताकद पणाला लावली. गजानन सूर्यवंशी यांची पत्नी गोदावरी सूर्यवंशी, भाऊ सचिन सूर्यवंशी, भावजय सुप्रिया सूर्यवंशी, मेहुणा युवराज वाघमारे आणि नातेवाईक रीना व्यवहारे अशा सहा उमेदवारांना भाजपच्या तिकिटावर रिंगणात उतरवण्यात आले. मात्र मतदारांनी या ‘एकाच कुटुंबाच्या राजकारणाला’ सपशेल नाकारत सर्वच्या सर्व उमेदवारांचा पराभव केला.

हे वाचलं का?

    follow whatsapp