मुंबई: दिव्यांग महिलेचं लैंगिक शोषण! नशेचे पदार्थ मिसळून खायला दिलं अन्... शेवटी आरोपीने केलं ब्लॅकमेल
एका दिव्यांग तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची माहिती समोर आली असून पीडितेने तब्बल 16 वर्षांनंतर, तिच्यासोबत घडलेली ही भयानक घटना उघडकीस आणली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबईत दिव्यांग महिलेचं लैंगिक शोषण!
नशेचे पदार्थ मिसळून खायला दिलं अन्...
शेवटी आरोपीने तरुणीला केलं ब्लॅकमेल
Mumbai Crime: मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका दिव्यांग तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची माहिती समोर आली असून पीडितेने तब्बल 16 वर्षांनंतर, तिच्यासोबत घडलेली ही भयानक घटना उघडकीस आणली. पीडितेच्या तक्रारीनंतर, पोलिसांनी आरोपी महेश पवारला अटक केली. संबंधित आरोपी शारीरिकदृष्ट्या विकलांग म्हणूजेच मूक-बधिर असणाऱ्या तरुणींना टार्गेट करून त्यांचं लैंगिक शोषण, ब्लॅकमेलिंग आणि मानसिक छळ करायचा.
2009 मध्ये पीडितेवर लैंगिक अत्याचार...
मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेनं नुकतंच तिच्यासोबत घडलेल्या घृणास्पद प्रकाराबद्दल सांगितलं. इतकेच नव्हे तर, आरोपीच्या वागण्याला वैतागून एका दुसऱ्या तरुणीने सुद्धा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा माहिती आहे. आरोपी महेशच्या घाणेरड्या कृत्याला कंटाळून पीडितेने व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून तिच्या मित्रांना आणि साथीदारांना सांगितलं. पीडितेला बोलता येत नसल्याने तिने हातवारे करूनच या प्रकरणाबाबत तिच्या मैत्रिणींना सांगितलं. यामध्ये, आरोपीने तरुणीला नशेचं औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचं पीडितेने सांगितलं. 2009 मध्ये तिच्यासोबत ही घटना घडली असून त्यावेळी ती अल्पवयीन होती.
मादक पदार्थ मिसळून खायला दिलं अन्...
पीडित तरुणी ही मुंबईच्या पश्चिम उपनगरातील रहिवासी असून तिने सांगितलं की, 2009 मध्ये तिची मैत्रीण तिला फिरायला जाण्याच्या बहाण्याने सांताक्रूझच्या वाकोला येथे आरोपी महेशच्या घरी घेऊन गेली. तिथे, आरोपीने पीडितेचा वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने समोसे आणि ड्रिंक्स पाजले, ज्यात मादक पदार्थ मिसळण्यात आला होता. काही वेळानंतर, तिची मैत्रीण तिथून निघून गेली.
हे ही वाचा: खासदार ओमराजे निंबाळकरांना मोठा हादरा, नेतृत्वात लढलेल्या सर्व नगरपालिका निवडणुकांमध्ये सुपडा साफ
घृणास्पद कृत्य अन् अश्लील व्हिडीओ शूट
पीडित तरुणीने सांगितलं की, तिची मैत्रीण महेशच्या घरातून निघून गेल्यानंतर आरोपीने तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केलं आणि त्या घटनेचा व्हिडीओ सुद्धा बनवला. त्यानंतर, त्याने त्या व्हिडीओच्या आधारे पीडितेला ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. पीडिता पुढे म्हणाली की, बराच काळ तिने या भयानक घटनेबद्दल कोणाला काहीच सांगितलं नाही. आरोपी महेश तिला सतत धमक्या देत होता, त्यामुळे समाजाच्या भितीमुळे ती कोणाला काहीच सांगू शकली नाही. अखेर, तरुणीने धाडस दाखवलं आणि आपल्या पतीला या घटनेबद्दल सांगितलं.










