बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती सध्या काय करतेय?
अभिनेत्री रिया चक्रवर्ती जास्त प्रसिद्धीच्या झोतात आली, ती अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर. रिया चक्रवर्तीने तिच्या आतापर्यंतच्या आयुष्यात अनेक अडचणींचा सामना केला. रिया चक्रवर्तीने अनेक चित्रपटात काम केलं असून, चेहरे चित्रपटापासून ती गायब आहे. रिया चक्रवर्तीने अलिकडेच ३०वा वाढदिवस (१ जुलै) साजरा केला. रिया चक्रवर्तीच्या आतापर्यंतच्या करिअरबद्दल बोलायचं झालं, तर तिने २००९ मध्ये एमटिव्ही इंडियाच्या […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
अभिनेत्री रिया चक्रवर्ती जास्त प्रसिद्धीच्या झोतात आली, ती अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर. रिया चक्रवर्तीने तिच्या आतापर्यंतच्या आयुष्यात अनेक अडचणींचा सामना केला.
हे वाचलं का?
रिया चक्रवर्तीने अनेक चित्रपटात काम केलं असून, चेहरे चित्रपटापासून ती गायब आहे.
ADVERTISEMENT
रिया चक्रवर्तीने अलिकडेच ३०वा वाढदिवस (१ जुलै) साजरा केला.
ADVERTISEMENT
रिया चक्रवर्तीच्या आतापर्यंतच्या करिअरबद्दल बोलायचं झालं, तर तिने २००९ मध्ये एमटिव्ही इंडियाच्या टीव्हीएस स्कूटी ‘टीन दिवा’सोबत स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं. या शो मध्ये रिया पहिली रनर अप राहिली होती.
रिया चक्रवर्तीने नंतर एमटीव्ही व्हीजे बनण्यासाठी ऑडिशन दिली होती आणि तिचं सिलेक्शनही झालं होतं.
रिया चक्रवर्ती त्यानंतर हळूहळू अभिनय क्षेत्रात प्रगती करत गेली. तिने अनेक व्यावसायिक जाहिरातीमध्ये काम केलं.
नंतर रिया चक्रवर्तीने सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. तुनीगा तुनीगा या तेलगू सिनमापासून रियाने अभिनयाची खऱ्या अर्थाने सुरूवात केली. २०१२ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
रिया चक्रवर्तीने नंतर ‘मेरे डॅड की मारूती (२०१३)’, ‘सोनाली केबल (२०१४)’, ‘बँक चोर (२०१७)’ आणि ‘जिलेबी’ या सिनेमामध्ये भूमिका साकारलेल्या आहेत.
रिया चक्रवर्तीची शेवटी मोठ्या पडद्यावर दिसली ती चेहरे सिनेमात. हा चित्रपट २०२१ मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता.
चेहरे सिनेमात रिया चक्रवर्तीची भूमिका विशेष नव्हती. या सिनेमात मोठी स्टार कास्ट होती, मात्र तरीही सिनेमा फार कमाल दाखवू शकला नाही.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूपासून रिया चक्रवर्तीला एकाही सिनेमाची ऑफर मिळाली नाही. त्यामुळेच ती पडद्यापासून दूर आहे.
हल्ली तर ती सोशल मीडियावरही फार सक्रिय नसते. सध्या तरी रिया चक्रवर्तीकडे कोणताही प्रोजेक्ट नाहीये.
रिया चक्रवर्ती सध्या मोजक्याच डिझायनर्ससोबत फोटोशूट करताना दिसत असते. हल्ली रिया चक्रवर्ती जाहिरातींमध्येही दिसत नाही.
काही दिवसांपूर्वी रिया चक्रवर्ती एका स्टुडिओमध्ये दिसली होती. तिच्या हातात स्क्रिप्टही होती. ती स्क्रिप्ट नेमकी कोणत्या प्रोजेक्टची होती, याची माहिती अजूनही समोर आलेली नाही.
रिया चक्रवर्ती अधूनमधून मुंबईत जीम वा सलून बाहेर दिसून येते. रिया चक्रवर्तीचं आयुष्य बरंच बदलल्याचं दिसतं.
फोटो-रिया चक्रवर्ती/इन्स्टाग्राम
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT