'चला हवा येऊ द्या' परत येणार, नवीन सीझनमध्ये एक नवा हुकमी एक्का!
'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचा दुसरा सीझन लवकरच येत आहे. ज्यामध्ये यंदा गौरव मोरे हा देखील असणार आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाने 10 वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. ऑगस्ट 2014 ते मार्च 2024 या कालावधीत या कार्यक्रमाने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. दिग्दर्शक-अभिनेता निलेश साबळेने या कार्यक्रमाची धुरा सांभाळली होती. CHYD चालू असताना यामधील प्रहसनांमध्ये नवीन काही पाहायला मिळत नाहीये अशी टीका झालेली. मात्र कार्यक्रम जेव्हा अचानक बंद करण्यात आला, तेव्हा असंख्य प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती.
आता प्रेक्षकांची ही नाराजी लवकरच संपणार आहे. कारण चला हवा येऊ द्याचा नवीन सीझन लवकरच झी मराठीवर येणार आहे. नुकतंच झी मराठीने एक टीझर प्रदर्शित केला आहे. यंदाच्या सीझनमधील एक खास बाब म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रामधून घराघरात पोहचलेला अभिनेता आणि हास्यवीर गौरव मोरेही आता 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर दिसणार आहे.
'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम 2014 मध्ये झी मराठीवर सुरू झाला त्यानंतर त्याला महाराष्ट्रात तुफान रिस्पॉन्स मिळाला. निलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, श्रेया बुगडे या कलाकारांच्या जबरदस्त अदाकारीमुळे हा कार्यक्रम तुफान लोकप्रिय झाला होता.
आता या कलाकरांमध्ये अजून एका लोकप्रिय कलाकाराची भर पडणार आहे. नवीन सीझनमध्ये आकर्षण असणार आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरेचं.. पवई फिल्टर पाड्याचा गौरव मोरे चला हवा येऊ द्याच्या नवीन सीझनमध्ये आपल्याला दिसणार आहे.










