Personal Finance: समजून घ्या 8 व्या वेतन आयोगाचं नेमकं गणित, पगारवाढ होणार पण...

मुंबई तक

8th Pay Commission Update: पगार वाढेल की नाही? फिटमेंट फॅक्टरमध्ये समस्या का आहे? आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी कधी अपेक्षित आहे? जाणून घ्या सारं काही सविस्तरपणे.

ADVERTISEMENT

Personal Finance: समजून घ्या 8 व्या वेतन आयोगाचं नेमकं गणित
Personal Finance: समजून घ्या 8 व्या वेतन आयोगाचं नेमकं गणित
google news

Personal Finance 8th Pay Commission: केंद्र सरकारच्या 35 लाख कर्मचाऱ्यांना आणि 67 लाख पेन्शनधारकांना आतापर्यंत कळले आहे की, आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी 1 जानेवारी 2026 पासून लागू होतील आणि पगारात लगेच वाढ होईल. आठव्या वेतन आयोगाची स्थापना जाहीर करण्यात आली आहे. वेतन आयोगाकडूनही पगारवाढ निश्चित आहे. पण, 1 जानेवारीपासूनच पगारवाढ होईल याची खात्री नाही.

इकॉनॉमिक टाईम्सने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे की, 1 जानेवारीची अंतिम मुदत चुकू शकते. वेतन आयोगाबाबत सरकारमध्ये गोंधळ आहे, परंतु 1 जानेवारीपासून पगारवाढ तात्काळ लागू होईल असं अजिबात नाही.

सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा केली, परंतु आतापर्यंत यासाठी जे करायला हवे होते ते होताना दिसत नाहीए. सरकारने अद्याप आयोग स्थापन केलेला नाही. आयोगाच्या अटी आणि शर्ती (Terms of Reference) अद्याप निश्चित केलेल्या नाहीत. या अनिश्चिततेबद्दल कर्मचारी संघटना आवाज उठवत आहेत.

सातवा वेतन आयोग लागू होण्यासाठी लागलेली 2 वर्षे

2016 च्या 7व्या वेतन आयोगाची घोषणा 2014 मध्ये झालेली. म्हणजेच अंमलबजावणीसाठी दोन वर्षे लागलेली, त्यानंतर 2016 मध्ये 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात आल्या. आठवा वेतन आयोग तयार केल्यानंतर, अहवाल तयार करण्यासाठी 18 ते 24 महिने द्यावे लागतील. यापूर्वीही, वेतन आयोगाला जवळजवळ इतका वेळ देण्यात आला आहे. काम खूप वेगाने झाले असले तरी, 2026 च्या अखेरीस किंवा 2027 च्या सुरुवातीपूर्वी वेतन आयोगाच्या शिफारशी येण्याची अपेक्षा नाही.

हे वाचलं का?