Personal Finance: गृहकर्जाचे व्याजदर वाढल्यास EMI किती वाढतो? जाणून घ्या तुमचे किती पैसे जातात
Home Loan EMI: गृहकर्जाचे व्याजदर वाढल्यास EMI देखील वाढतो. पण अशावेळी अनेक जण त्याचा फारसा विचार करत नाहीत. मात्र याच गोष्टींचा तुमच्या दैनंदिन बजेटवर मोठा फरक पडत असतो.
ADVERTISEMENT

Personal Finance Tips
Personal Finance tips for Home Loan EMI: घर खरेदी करताना बहुतांश लोक गृहकर्जाचा आधार घेतात. मात्र, गृहकर्ज घेतल्यानंतर व्याजदर वाढले तर कर्जदारांच्या मासिक बजेटवर मोठा परिणाम होऊ शकतो. व्याजदरातील अगदी 0.5 टक्के किंवा 1 टक्क्याची वाढही दीर्घकालीन कर्जामध्ये लाखो रुपयांचा अतिरिक्त खर्च निर्माण करू शकते.
EMI म्हणजे काय?
EMI (Equated Monthly Installment) म्हणजे कर्जदाराने बँकेला दर महिन्याला भरायची निश्चित रक्कम. यामध्ये मूळ कर्जाची रक्कम आणि व्याज या दोन्हींचा समावेश असतो.
गृहकर्जाच्या EMI वर तीन गोष्टींचा प्रभाव असतो:









