Personal Finance: 'ही' कागदपत्रं नसतील तर चुकूनही खरेदी करू नका Resale Flat!
Resale Flat Documents: एका ओनरकडून फ्लॅट खरेदी करताना केवळ किंमत आणि लोकेशन पाहणे पुरेसे नसते. त्यासाठी अनेक कागदपत्रे तपासणे अत्यावश्यक आहे. जाणून घ्या कोणती कागदपत्रं आहेत ती..
ADVERTISEMENT

Personal Finance tips for Documents for Resale Flats: घर खरेदी करणे हे आयुष्यातील सर्वात मोठ्या आर्थिक निर्णयांपैकी एक मानले जाते. विशेषतः एखाद्या व्यक्तीकडून (Single Owner) रीसेल फ्लॅट खरेदी करताना अनेकजण केवळ किंमत, लोकेशन आणि सुविधांवर लक्ष केंद्रित करतात. मात्र, फ्लॅटची कायदेशीर कागदपत्रे तपासली नाहीत तर भविष्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे फ्लॅट खरेदी करण्यापूर्वी सर्व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
1. सेल डीड (Sale Deed)
फ्लॅटच्या मालकीचा सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे सेल डीड. सध्याच्या मालकाने फ्लॅट कसा विकत घेतला, त्याची नोंद या दस्तऐवजात असते. हा दस्तऐवज नोंदणीकृत (Registered)असणे आवश्यक आहे.
2. टायटल क्लिअरन्स आणि चेन ऑफ डॉक्युमेंट्स
फ्लॅटचा मालकी हक्क स्पष्ट आहे का, याची खात्री करणे आवश्यक आहे. मागील 30 वर्षांतील मालकी हस्तांतरणाची कागदपत्रे (Chain Documents) तपासावीत. यामुळे मालमत्तेवर कोणाचा दावा नाही याची खात्री होते.
3. एनकम्ब्रन्स सर्टिफिकेट (Encumbrance Certificate)
या प्रमाणपत्रातून फ्लॅटवर कोणतेही कर्ज, गहाण किंवा कायदेशीर बोजा आहे की नाही याची माहिती मिळते. सब-रजिस्ट्रार कार्यालयातून हे प्रमाणपत्र मिळू शकते.









