Sachin Tendulkar: ‘बाईपण भारी देवा…’ची क्रिकेटच्या ‘देवाला’ही भुरळ, सिनेमा पाहताच Video कॉल..

अजय परचुरे

ADVERTISEMENT

sachin tendulkar watching baipan bhari deva movie and made a video call to the actress deepa parab marathi movie
sachin tendulkar watching baipan bhari deva movie and made a video call to the actress deepa parab marathi movie
social share
google news

Sachin Tendulkar Watching Baipan Bhaari Deva: मुंबई: ‘बाईपण भारी देवा…’ (Baipan Bhaari Deva) सध्या सर्वत्र या चित्रपटाची जादू अशी काही पसरलीय की ती ओसरायचे नावचं घेत नाही. प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींना या मराठी चित्रपटाची (Marathi Movie) भुरळ पडली आहे. जो तो चित्रपटाचे तोंडभरुन कौतुक करत आहे. या चित्रपटानिमित्त दिवसभर कामाच्या ओझ्यात बुडालेला महिलावर्गही सिनेमा पाहण्यास मोठ्या संख्येने गेला. ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट पाहण्याचा मोह क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरलाही (Sachin Tendulkar) आवरला नाही. (sachin tendulkar watching baipan bhari deva movie and made a video call to the actress deepa parab marathi movie)

सचिनने देखील काल (6 ऑगस्ट) हा चित्रपट पाहिला. सचिनसाठी खास या सिनेमाच्या शोचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे, राज ठाकरे निर्माते अजित भुरे आणि सिनेमांतील इतर कलाकार उपस्थित होते.

हे ही वाचा >> Manipur Video, Devoleena Bhattacharjee : यासारखं नीच कृत्य…’, अभिनेत्री भडकली

सिनेमा पाहून झाल्यावर कोणीतरी या सिनेमातील अभिनेत्री दिपा परब हिला व्हिडिओ कॉल लावला. तेव्हा तो फोन घेत सचिनने थेट दिपाशी संवाद साधला आणि तिचे तोंडभरुन कौतुक केले. यासंबंधीचा व्हिडिओ दिपानेदेखील तिच्या सोशल मीडिया अकाउंटला शेअर केला आहे. दिपाने एक व्हिडिओ पोस्ट करत लिहिले की, THE DREAM COME TRUE MOMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘आयुष्यभरासाठी मनावर कोरला गेलेला हा एक क्षण’

सचिन… द सचिन तेंडुलकर… लाखो-करोडो चाहते आहेत त्यांचे, मी देखील त्यांच्यापैकीच एक. त्यांची भेट होणं… ही माझ्यासाठी खरंच एक फॅन मोमेंट आहे. ‘बाई पण भारी देवा’ चित्रपटाने खरंच आम्हाला भरपूर काही दिलंय पण सचिन तेंडुलकर येऊन चित्रपट बघतील, त्यांना तो आवडेल आणि त्याचं ते इतकं कौतुक देखील करतील याचा आम्ही कोणीही स्वप्नात देखील विचार नव्हता केला. पण…YES…It’s Fact… शब्दांत न मांडता येणारा पण आयुष्यभरासाठी मनावर कोरला गेलेला हा एक क्षण.

ADVERTISEMENT

मालिकेच्या शूटिंग मध्ये व्यस्त असल्यामुळे मला प्रत्यक्ष स्क्रीनिंगला जाता आले नाही. ज्या व्यक्तीला आयुष्यात एकदा तरी भेटायची इच्छा होती त्याला भेटण्याची संधी समोरून चालून आलेली असता मी त्या संधीला मुकले असं वाटत असतानाच मला व्हिडीओ कॉल येतो आणि प्रत्यक्ष सचिन तेंडुलकर यांच्याशी संवाद साधला जातो.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> पाच अफेअर्सनंतर सहाव्या गर्लफ्रेंडशी लग्न, कोण आहे ‘हा’ 57 वर्षीय अभिनेता?

आम्हा सर्व जणींचा अभिनय, चित्रपट त्यांना आवडला हे ऐकून खूप छान वाटलं… अजूनही हे सर्व काही स्वप्नवतच आहे. THANK YOU निखिल साने आणि अजित भुरे आयुष्यभर लक्षात राहणाऱ्या ह्या एका अविस्मरणीय फोनसाठी.

तर सचिननं देखील चित्रपटाचे कौतुक केलं आणि म्हणाला की, “बाईपण भारी देवा ही 6 बहिणींची हृदयस्पर्शी कथा आहे. हा मराठी चित्रपट पाहून मला खूप आनंद झाला. शिवाय चित्रपटातील कलाकारांना भेटणे हा एक सुंदर अनुभव होता.”

सचिन तेंडुलकराच्या या पोस्टनंतर सिनेमातील कलाकारांसोबत संपूर्ण टीमचाच हुरूप प्रचंड वाढला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT