आश्वासन देऊनही दिला नाही अवॉर्ड, मग सलमान खानने असा घेतला बदला
पुरस्कार देण्याचं आश्वासन देऊनही पूर्ण न केल्यानं सलमान खानला राग आला. या गोष्टीबद्दल सलमानने आता खुलासा केला.
ADVERTISEMENT
Salman khan : बॉलिवूडमध्ये जर कोणी दबंग अभिनेता असेल तर तो सलमान खान आहे. भाईजान या नावाने प्रसिद्ध असलेला सलमान खान त्याच्या वेगळ्या शैलीसाठी ओळखला जातो. सलमान कधीच आपले मनातलं सांगायला मागेपुढे पाहत नाही. अशा परिस्थितीत आता त्याने अवॉर्ड शोचे रहस्य उलगडून चर्चेत स्थान निर्माण केले आहे. सलमानने पत्रकार परिषदेत सांगितले की, एकदा आश्वासन देऊनही पुरस्कार कसा दिला गेला नाही. तसेच हे घडल्यावर त्याने काय केले, याबाबत तो बोलला आहे.
ADVERTISEMENT
जेव्हा सलमानला पुरस्कार मिळाला नाही
सलमान खान म्हणतो, ‘मला अवॉर्ड शोमध्ये यायला सांगितलं होतं आणि आम्ही तुम्हाला अवॉर्ड देणार आहोत असं म्हणाले. म्हणून मी वडिलांसोबत तिथे पोहोचलो. माझ्या वडिलांनी सूट घातला होता. माझे संपूर्ण कुटुंब तिथे आले. आणि त्यानंतर नॉमिनेशन जाहीर झालं. मग म्हटलं की सलमान खान सर्वोत्तम अभिनेता आहे… म्हणून मी उभा राहिलो. मग दुसरे नाव घेतले आणि त्यानंतर जॅकी श्रॉफला हा अवॉर्ड देण्यात आला. मला तो अवॉर्ड मिळवायचा होता, म्हणून माझे वडील म्हणाले – हे काय आहे?’
Salman Khan : गँगस्टरकडून जीवे मारण्याची धमकी, सलमानचं काय आहे म्हणणं?
सलमान पुढे सांगतो, ‘मी तिथे पहिल्यांदाच स्टेजवर परफॉर्म करणार होतो. म्हणून मी स्टेजच्या मागे गेलो आणि मी म्हणालो, ‘मी हे करू शकत नाही. तुम्ही लोकांनी ते बरोबर केले नाही. आता मला पर्वा नाही. अजिबात फरक पडत नाही. असे काय झाले की हा अवॉर्ड जॅकीला देण्यात आला. अर्थात, परिंदा या चित्रपटात त्याने उत्तम काम केले होते, पण तुम्ही लोकांनी माझ्यासोबत असे करायला नको होते. तुम्ही माझ्या वडिलांचा मित्र आहेत , तुम्ही असं करायला नको होतंस, असं सलमान म्हणाला.
हे वाचलं का?
परफॉर्मन्ससाठी पाचपट मानधन
यानंतर सलमानला सांगण्यात आले की त्याला परफॉर्म करायचे आहे. मात्र अभिनेत्याने तसे करण्यास स्पष्ट नकार दिला. सलमान सांगतो की त्या व्यक्तीने त्याच्याकडे पाहून हसले आणि त्याला परफॉर्मन्ससाठी पैसे देऊ केले. या सलमानने पैशासाठी सौदेबाजी केली आणि मूळ किंमतीपेक्षा पाचपट जास्त पैसे घेतले. यावर त्या व्यक्तीने त्याला बाहेर कोणाला सांगू नकोस असे सांगितले. मात्र, काही वर्षांनंतर सलमान खानने अवॉर्ड शोची पोलखोल केलीच.
सलमान खान लवकरच ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 2033 च्या ईदला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात सलमानसोबत पूजा हेगडे, साऊथ स्टार वेंकटेश, भूमिका चावला, सिद्धार्थ निगम, शहनाज गिल आणि पलक तिवारी हे कलाकार दिसणार आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT