Gangubai kathiawadi : पतीने ५०० रुपयांसाठी विकलेली बाई मुंबईची माफिया क्वीन बनली!
बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या गंगुबाई काठियावाडी सिनेमाची सध्या बरीच चर्चा आहे. अभिनेत्री आलिया भट्ट यात गंगुबाईची भूमिका साकारतेय. सिनेमाबद्दल दिवसेंदिवस उत्कंठा वाढत असून, अनेकांच्या मनात हा प्रश्न आहे की नक्की ही गंगूबाई काठियावाडी आहे तरी कोण आणि तिने असं काय केलं? ज्यामुळे तिच्यावर इतका मोठा सिनेमा तयार होतोय… तर आज जाणून घेऊया […]
ADVERTISEMENT

बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या गंगुबाई काठियावाडी सिनेमाची सध्या बरीच चर्चा आहे. अभिनेत्री आलिया भट्ट यात गंगुबाईची भूमिका साकारतेय. सिनेमाबद्दल दिवसेंदिवस उत्कंठा वाढत असून, अनेकांच्या मनात हा प्रश्न आहे की नक्की ही गंगूबाई काठियावाडी आहे तरी कोण आणि तिने असं काय केलं? ज्यामुळे तिच्यावर इतका मोठा सिनेमा तयार होतोय… तर आज जाणून घेऊया की गंगुबाई काठियावाडी कोण होती?
मुंबईतील कामाठीपुरा परिसर म्हणजेच रेड लाईट एरिया. प्रत्येक मुंबईकर या भागातून जाताना जरा दबकूनच जातो. जशी वर्ष सरत गेली, तशी कामाठीपुऱ्यातील परिस्थिती ही बदलत गेली. मात्र देहविक्री करणाऱ्या महिलांच्या मनात आजही एक नाव कायम आहे… ते म्हणजे गंगुबाई काठियावाडी!
कामाठीपुऱ्यातील प्रत्येक घरात आजही गंगूबाईचा फोटो आहे आणि या भागात गंगुबाईचा पुतळा आहे; ज्याला आजही तितक्याच श्रद्धेने पूजलं जातं. यामागचं कारण म्हणजे गंगुबाई काठियावाडी या कामाठीपुऱ्याची राणीच होत्या. गंगुबाई काठियावाडी हा सिनेमा हुसेन जैदी यांच्या माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकावर आधारित आहे. यातील माहितीनुसार गंगुबाईचं खरं नाव गंगा हरजीवनदास असं होतं.
गुजरातमधील काठियावाडीत तिचा जन्म झाल्याने कालांतराने तिचं नाव गंगुबाई काठियावाडी असं झालं. गंगुबाईला लहानपणापासूनच सिनेमाचं वेड होतं. मुंबईत जायचं आणि अभिनेत्री व्हायचं हे एक स्वप्न उराशी तिने बाळगलं होतं. पण नियतीच्या मनात वेगळंच होतं. तिच्या वडिलांकडे काम करणाऱ्या अकाऊंटट रमणीकलाल सोबत तिचे प्रेमसंबंध सुरू झाले.









