टाईमपास 3 सिनेमाचा मुहूर्त पडला पार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नया है वह…हा डायलॉग आला की टाईमपास या सिनेमाची प्रत्येकाला आठवण येते. तर लवकरच टाईमपास सिनेमाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कारण नुकतंच या सिनेमाचा मुहूर्त पार पडला आहे. त्यामुळे आता टाईमपासमधील दगडू पुन्हा वेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर आहे.

ADVERTISEMENT

टाईमपास 3च्या मुहूर्ताचा फोटो रवी जाधव यांनी इन्स्टाग्रामवरून शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना मोरया आशिर्वाद असावा. हा फोटो पाहिल्यावर सिनेमा कधी रिलीज होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान टाईमपास 3 च्या शुटींसाठी रवी जाधव यांनी फार उत्सुक असल्याचं म्हटलंय.

तर टाईमपास 3 या सिनेमामध्ये हृता दुर्गुळेची एन्ट्री होणार आहे. तिच्यासोबत प्रथमेश परब तसंच वैभव मांगले प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तिसऱ्या सिनेमाच्या लेखनाची जबाबदारी अभिनेता-लेखक प्रियदर्शन जाधव याच्यावर देण्यात आलीये.

हे वाचलं का?

दरम्यान ऋता दुगुळे मराठी सिरीयलींमधून घराघरात पोहचलीये. काही महिन्यांपूर्वी तिने ‘सिंगिंग स्टार’ या रिएलिटी शोचं सूत्रसंचलनही केलं. लवकरच ती ‘अनन्या’ या चित्रपटातून चित्रपटात पदार्पण करणार आहे. याचप्रमाणे ती ‘दादा एक गूड न्यूज आहे.’ या नाटकामध्ये उमेश कामतसोबत मुख्य भूमिकेत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT