Vaibhavi Upadhyaya : काच फोडली, गाडीतून बाहेर पडण्यासाठी धडपडली, पण…
‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ फेम अभिनेत्री वैभवी उपाध्यायचा 23 मे रोजी रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. वैभवीच्या आकस्मिक निधनामुळे टीव्ही इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.
ADVERTISEMENT
Vaibhavi Upadhyaya Died : ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ फेम अभिनेत्री वैभवी उपाध्यायचा (Vaibhavi Upadhyaya) 23 मे रोजी एका भीषण कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. वैभवीच्या मृत्यूमुळे टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. वैभवी तिच्या होणाऱ्या पतीसोबत हिमाचल प्रदेशातील तीर्थन व्हॅलीला कारमध्ये जात असताना काळाने घाला घातला. वळण रस्त्यावर कारवरील नियंत्रण सुटले आणि वैभवीची कार 50 फूट खोल दरीत कोसळली. वैभवीने सीटबेल्ट घातला नसल्याचेही बोलले जात आहे.
ADVERTISEMENT
या अपघातात वैभवीचा मृत्यू झाला तर तिच्या होणाऱ्या पतीचे प्राण वाचले आहेत. हा अपघात नेमका कसा झाला, याचे कारण शोधण्याचा काम सध्या पोलिसांकडून सुरू आहे. आता मिळालेल्या माहितीनुसार, असं म्हटलं जात आहे की, वैभवीच्या मृत्यूबद्दल नवीन अपडेट समोर आली आहे. अपघातानंतर वैभवीने कारच्या खिडकीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे.
फडणवीसांसमोर राम शिंदे-राधाकृष्ण विखे पाटलांमधील मतभेद चव्हाट्यावर, काय घडलं?
पोलिसांनी केला नवा दावा
कुल्लूचे पोलीस अधीक्षक साक्षी वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर वैभवीचं डोक फुटलं होतं. तरीही तिने कारची काच फोडण्याचा प्रयत्न केला. तसेच कारमधून बाहेर पडण्यासाठी धडपड केली, मात्र तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं तिचे हे प्रयत्न अपुरे पडले. त्यानंतर तिला बंजार येथील सिव्हिल रूग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. वैभवी कार वेगात चालवत होती, त्यामुळेच हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. गाडी चालवताना तिच्याकडून निष्काळजीपणा झाल्याचे म्हटले जात आहे.
हे वाचलं का?
सरकारी अधिकाऱ्याचा प्रताप, सेल्फी घ्यायला गेला.. नंतर साहेबांनी अख्खा तलावच उपसला!
आतापर्यंत ‘या’ मालिका आणि चित्रपटांमध्ये वैभवीने केले आहे काम…
वैभवी उपाध्याय एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री होती. तिने अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे, पण तिला खरी ओळख ‘साराभाई वर्सेस साराभाई’ या मालिकेतून मिळाली. याशिवाय तिने दीपिका ‘छपाक’ चित्रपटातही काम केले होते. राजकुमार राव आणि टिमरी यांची भूमिका असलेल्या सिटी लाइट्स या बॉलिवूड चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT