सरकारी अधिकाऱ्याचा प्रताप, सेल्फी घ्यायला गेला.. नंतर साहेबांनी अख्खा तलावच उपसला!

मुंबई तक

ADVERTISEMENT

food inspector suspended for draining lakhs of liters of water from dam for mobile
food inspector suspended for draining lakhs of liters of water from dam for mobile
social share
google news

Viral Video: कांकेर (छत्तीसगड): भारतात अशा काही विचित्र घटना समोर येत आहेत की, ज्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेबाबतच सवाल उपस्थित होतात. आता पुन्हा एकदा तसाच सवाल निर्माण झाला आहे. ते छत्तीसगडच्या एका अधिकाऱ्यामुळे. त्यांचं झालं असं की, महागडा मोबाइल (Mobile) फोन परत मिळावा यासाठी छत्तीसगडमधील कांकेरच्या पाखंजूर येथील धरणातून लाखो लिटर पाणी (Water) विनाकारण सोडून दिल्याप्रकरणी अन्न निरीक्षक राजेश विश्वास यांना आता निलंबित करण्यात आले आहे. उत्तर बस्तर कांकेरच्या जिल्हाधिकारी प्रियंका शुक्ला यांनी त्यांच्या निलंबनाचा आदेश जारी केला आहे. (food inspector suspended for draining lakhs of liters of water from dam for mobile)

नेमकं काय घडलं?

जिल्हाधिकारी प्रियंका यांनी जारी केलेल्या आदेशात असे लिहिले आहे की, पखंजूर अन्न निरीक्षक राजेश विश्वास यांनी त्यांचा पाण्यात पडलेला मोबाइल शोधण्यासाठी सलग चार दिवस परळकोट जलाशयाच्या पश्चिम वेअर दरम्यान सुमारे 21 लाख लिटर पाणी डिझेल पंपाद्वारे उपसले. याबाबत एसडीएम पाखंजूर यांच्याकडे चौकशी करण्यात आली. त्याच्या अहवालानुसार, राजेश विश्वास यांनी परवानगीशिवाय जलाशयातील 41104 घनमीटर पाणी हे विनाकारण उपसले. हा उपसा केल्यानंतर अधिकाऱ्याचा फोन सापडला.

पाणी काढण्यासाठी अन्न निरीक्षक राजेश विश्वास यांनी कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याची परवानगी न घेता आपल्या पदाचा गैरवापर करून कडक उन्हाळ्यात लाखो लिटर पाण्याची नासाडी केली. हे त्यांचे असभ्य वर्तन आहे ज्यांच समर्थन होऊच शकत नाही.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Crime: पोलीस महिलेसोबत लव्ह, सेक्स, अन्.. इंस्टाग्राममुळे घडली आयुष्यभराची अद्दल

अन्न निरीक्षक राजेश विश्वास यांना छत्तीसगड नागरी सेवा नियमांच्या विरोधात काम केल्याबद्दल तत्काळ प्रभावाने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबनाच्या काळात त्यांचे मुख्यालय जिल्हा कार्यालय, अन्न शाखा, कांकेर हे असेल आणि जोपर्यंत ते निलंबित राहतील, तोपर्यंत विश्वास यांना नियमानुसार निर्वाह भत्ता दिला जाईल.

सेल्फी घेताना डॅममध्ये पडला 96 हजारांचा फोन

याबाबत अन्न निरीक्षक राजेश विश्वास यांनी सांगितले की, ‘सोमवारी परळकोट जलाशयाच्या ओव्हरफ्लो पाण्यात माझा फोन पडला होता, आता माझा फोन सापडला आहे. सेल्फी घेताना माझ्या हातातून तो फोन निसटला होता. काही जणांनी पाण्यात उतरून तो शोधण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांना मोबाइल काही सापडला नाही. त्यामळे मी जलसंपदा विभागाच्या एसडीओशी बोलून त्यांना सांगितले की, तसंही हे पाणी काही वापरले जात नाही. त्यानंतर पाच फूट पाणी हे बाहेर काढण्यात आले.’ त्यांनी पुढे सांगितले की सॅमसंग कंपनीच्या एस सीरीजचा तो फोन आहे, ज्याची किंमत सुमारे 96,000 रुपये आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> ‘महिलेसोबत नको त्या अवस्थेत…’, गिरीश महाजनांवर टीका करताना एकनाथ खडसे काय बोलले?

जलसंपदा विभागाचे उपविभागीय अधिकारी रामलाल धिवर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाच फुटांपर्यंत पाणी रिकामे करण्यास तोंडी परवानगी देण्यात आली होती, मात्र आतापर्यंत 10 फुटांपर्यंत पाणी रिकामे करण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT