Nitin Desai यांच्या अकाउंटवर सुंदर सेट्सची गर्दी, पण शेवटची पोस्ट कोणती?
बॉलिवूडचे प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी वयाच्या 58 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या आत्महत्येच्या बातमीने सिनेसृष्टीसह चाहत्यांना धक्का बसला आहे. सध्या सोशल मीडियावर चाहते आणि सेलेब्स नितीन यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. त्यांनी अनेक मोठ्या चित्रपटांचे आणि टीव्ही शोचे सेट डिझाइन केले.
ADVERTISEMENT
Nitin Desai Passed Away : बॉलिवूडचे प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी वयाच्या 58 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या आत्महत्येच्या बातमीने सिनेसृष्टीसह चाहत्यांना धक्का बसला आहे. सध्या सोशल मीडियावर चाहते आणि सेलेब्स नितीन यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. त्यांनी अनेक मोठ्या चित्रपटांचे आणि टीव्ही शोचे सेट डिझाइन केले. त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना 4 वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. (what is the last insta post of Nitin Desai)
ADVERTISEMENT
मुंबईजवळ कर्जत येथील स्टुडिओत त्यांनी आत्महत्या केली. दिग्दर्शक आणि कला दिग्दर्शक म्हणून त्यांनी इंडस्ट्रीत 20 वर्षे घालवली. विधू विनोद चोप्रा, राजकुमार इराणी, संजय लीला भन्साळी ते आशुतोष गोवारीकर यांच्यासोबतही त्यांनी काम केलं.
नितीन देसाई यांची शेवटची पोस्ट!
नितीन देसाई सोशल मीडियावर फार कमीच अॅक्टिव्ह असायचे. त्यांची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट 16 जुलैची आहे. ज्यामध्ये त्यांनी 1942: अ लव्ह स्टोरी या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. यामध्ये अनिल कपूर आणि मनीषा कोईराला आहेत. 1994 मध्ये आलेला हा चित्रपट त्यावेळी सुपरहिट ठरला होता. याचे दिग्दर्शन विधू विनोद चोप्रा यांनी केले होते. चित्रपटाला 29 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल नितीन यांनी हे पोस्ट केले होते.
हे वाचलं का?
चित्रपटाच्या पोस्टरसोबतच नितीन यांनी चित्रपटाच्या सेटवरील न पाहिलेले फोटोही शेअर केले आहेत. सगळीकडे हिरवळ आणि मधोमध असलेला आलिशान सेट 1942: अ लव्ह स्टोरी या चित्रपटासाठी तयार करण्यात आला होता.
View this post on Instagram
ADVERTISEMENT
52 एकरात पसरलेला आलिशान ND स्टुडिओ
नितीन देसाईंच्या इंस्टा अकाऊंटवर त्यांचे फोटो कमी आणि एनडी स्टुडिओ, टीव्ही-फिल्म सेट्सचे फोटो जास्त आहेत. ही भव्य दृश्ये पाहून कोणीही यात रमतं. त्यांनी अनेक बी-टाउन सेलिब्रिटींसोबतचे फोटोही पोस्टमध्ये शेअर केले आहेत. ते त्यांच्या प्रसिद्ध आणि आलिशान एनडी स्टुडिओसाठी ओळखले जातात. हा स्टुडिओ म्हणजे मुंबईची शान आहे.
ADVERTISEMENT
2005 मध्ये नितीन देसाई यांनी 52 एकरात पसरलेल्या या स्टुडिओची स्थापना केली. येथे इनडोअर आणि आउटडोअर शूटिंगसाठी जागा उपलब्ध आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एनडी स्टुडिओ हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. हा स्टुडिओ मुंबईपासून ९० मिनिटांच्या अंतरावर आहे.
किक, जोधा अकबर, स्लमडॉग मिलेनियर, बाजीराव मस्तानी, चक्रवर्ती सम्राट अशोक, प्रेम रतन धन पायो, ताजमहल, प्यार की ये एक कहानी या चित्रपटांचे सेट या स्टुडिओमध्ये लावण्यात आले होते.
नितीन देसाई यांचा मृत्यू कसा झाला?
नितीन देसाई हे कर्जत येथील त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये मृतावस्थेत आढळले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन देसाई मंगळवारी (1 ऑगस्ट) रात्री 10 वाजता त्यांच्या खोलीत गेले. सकाळी ते खोलीचा दरवाजा उघडत नव्हते. त्यानंतर त्यांचा बॉडीगार्ड आणि इतर लोकांनी दरवाजा ठोकला पण त्यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही. यामुळे खिडकीतून आत पाहिले असता नितीन देसाई पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.
नितीन देसाई 9 ऑगस्ट रोजी त्यांचा 58 वा वाढदिवस साजरा करणार होते, मात्र त्यापूर्वीच त्यांनी जीवन संपवलं. कर्जतचे आमदार महेश बालदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘नितीन गेल्या अनेक दिवसांपासून आर्थिक संकटाचा सामना करत होते. या अडचणीमुळे त्याने आत्महत्या केली असण्याची शक्यता आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.’
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT