The Kerala Story : बलात्कार, आत्महत्या अन् शिरच्छेद... सीन कसे झाले शूट? - Mumbai Tak
Mumbai Tak /बातम्या / The Kerala Story : बलात्कार, आत्महत्या अन् शिरच्छेद… सीन कसे झाले शूट?
बातम्या मनोरंजन

The Kerala Story : बलात्कार, आत्महत्या अन् शिरच्छेद… सीन कसे झाले शूट?

how to shoot the kerala story horrible scene?

द केरळ स्टोरी चित्रपट अडथळ्यांनंतर देशभरात प्रदर्शित झाला आहे. विषयामुळे चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या चित्रपटाबद्दल कर्नाटकातील प्रचारसभेत याचा उल्लेख करत दहशतवादाचा आणखी एक चेहरा असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, या चित्रपटातील काही दृश्ये ही प्रेक्षकांच्या अंगावर येणारी असून, त्याबद्दल चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर प्रशांतनु महापात्रा यांनी आजतकशी बोलताना भाष्य केलं आहे.

प्रशांतनु महापात्रा यांनी चित्रपटाच्या आशयाबद्दल बोलताना सांगितलं की, दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांच्यासोबत लव जिहादवर माहितीपट बनवला होता. त्यावेळी केरळात जाऊन पीडितेच्या कुटुंबीयांशी संवाद झाला होता. त्याचवेळी असा चित्रपट बनवण्याची कल्पना डोक्यात आली. त्या माहितीपटातील काही दृश्यही या चित्रपटात वापरली गेली आहेत.

द केरळा स्टोरीच्या शुटिंगवेळी कशी होती मनस्थिती?

सिनेमॅटोग्राफर प्रशांतनु यांनी शुटिंगच्या वेळचा अनुभवही सांगितला. ‘सिनेमॅटोग्राफर म्हणून काम करताना नेहमी भूमिकेपासून विभक्त होऊन आपलं काम करावं लागतं. आपण कितीही भावनिक असलो, तरी मन इतकं मजबूत करावं लागत. मन कठोर करून लायटिंग, कॅमेरा अँगल, शॉट्सचा दर्जा यासारख्या तांत्रिक बाबींवर जास्त लक्ष द्यावं लागतं. खरंतर हे काम खूप अवघड आहे. स्वतःशी एक युद्धच सुरू असतं. या सगळ्यात राहूनही तुम्हाला त्यापासून वेगळं ठेवावं लागतं.’

बलात्कार, हत्या… चित्रपटातील सीन असे केले शूट

‘चित्रपटाच्या शुटिंगवेळी रंगांबद्दल खूप काळजी घेतली गेली. म्हणजे अदा जेव्हा चौकशी कक्षात असते, तेव्हा आम्ही निळ्या रंगाचा वापर केला आहे. जेणेकरून तो सीन दिसावा. आम्ही मुद्दामहून जास्त गडद केलेला नाही. कारण शालिनी ही भूमिका एकाच ठिकाणी, एकाच खुर्चीवर बसून सर्व भावना प्रकट करते’, असं प्रशांतनु महापात्रा म्हणाले.

हेही वाचा >> आधी घोषणा नंतर यू-टर्न… शरद पवारांनी राजीनामास्त्राने नेमकं मिळवलं तरी काय?

‘आम्ही याचं शुटिंग अशा पद्धतीने केलं आहे की, हा प्रसंग डोक्यात राहावा. जबाब ती देत असली, तरी प्रेक्षकांनी विचार करावा. ती कुटुंबाबद्दल सांगते, प्रेमात पडल्याबद्दल, सीरियात झालेल्या बलात्काराबद्दल… अशा प्रसंगाचा जेव्हा ती उल्लेख करते तेव्हा ते प्रसंग प्रेक्षकांच्या डोक्यात सुरू होतात.’

‘तो’ सीन असा झाला शूट…

महापात्रांनी पुढे सांगितलं की, एका प्रसंग आहे, ज्यात शालिनीवर टेंटमध्ये लोक सातत्यानं बलात्कार करत आहेत. आम्ही त्याला प्रतिकात्मक पद्धतीने दाखवलं आहे. टेंटमधील लाईटच्या मदतीने आम्ही बलात्काराचा सीन शूट केला आहे. कारण तो सीन आनंदायी नाहीतर त्रासदायक आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी तो बघू नये तर अनुभवावा.

हेही वाचा >> शरद पवारांच्या ‘हनुमंती’ डावाने अजितदादांचा केला ‘करेक्ट कार्यक्रम?’

चित्रपटात नीमा व्यक्तिरेखा आहे. तिच्यावरील बलात्काराचा सीन आम्ही वेगवेगळ्या फ्रेममध्ये शूट केला आहे. एकत्र दाखवला असता, तर तो सनसनाटी दाखवणारा झाला असता. आम्हाला मुलीची हतबलता दाखवायची होती, असं ते म्हणाले.

वैवाहिक बलात्कार…

चित्रपटात आणखी एक प्रसंग आहे ज्यात शालिनी नावाच्या व्यक्तिरेखेवर वैवाहिक बलात्कार होतो. या प्रसंगात शालिनीच्या मनातील तिरस्कार दाखवयाचा होता. त्यामुळे टेबलच्या समोर तो सीन असून खिडकीच्या बाहेरून तो शूट करण्यात आला आहे. हा प्रसंग तिसऱ्या व्यक्तीच्या नजरेतून दाखवण्यात आला आहे, असं प्रशांतनु यांनी सांगितलं.

सीरियातील ते सीन भारतात कुठे केले शूट?

सीरिया आणि अफगाणिस्तानची सीमा दाखवण्यासाठी ते सीन लडाखमध्ये करण्यात आलं आहे. तिथे 15 दिवस दररोज 10 ते 12 तास शुटिंग केली जात होती. बर्फवृष्टी सुरू होण्यापूर्वी हे सीन शूट केले, असंही त्यांनी सांगितलं. काही सीन शूट करणं खूप अवघड होतं. एका सीन आहे ज्यात शालिनी त्या छावणीतून पळून जात आहे. तिथे मीही हातात कॅमेरा घेऊन पळत होतो. एका मुलीच्या आत्महत्येचाही सीन आहे. तो शूट करणं खूप अवघड गेला, असं ते म्हणाले.

वादळांना नावं कशी दिली जातात? समजून घ्या… अभिनेत्री Prajakta Mali चा बोल्ड लुक! ट्रोलर्स म्हणाले, ‘नको ग बाई..’ sonalee Kulkarni : अप्सरेचं पतीसोबत रोमँटिक फोटोशूट! Shruti Marathe च्या घायाळ करणाऱ्या अदांवर, चाहते फिदा! साधं राहणीमान असणाऱ्या Ratan Tata कडे आहेत ‘या’ खास वस्तूचं कलेक्शन Swara Bhaskar ने दिली Good News! शेअर केले खास Photo Sahid Kapoor पत्नीच्या ‘या’ सवयीने हैराण! लग्नाच्या 8 वर्षांनंतर सांगितलं सत्य मुंबईत या गँगस्टरची होती दहशत, नाव ऐकलं तरी फुटायचा घाम अनन्या, निसा, सुहानासोबत दिसणारा ‘हा’ तरूण भेटला राहुल गांधींना! Photo Viral Sara Ali Khan : कपिलने साराला विचारला शुबमनबद्दल प्रश्न, ती म्हणाली… WTC Final : विराट कोहलीला इतिहास रचण्याची संधी, 4 विक्रम मोडणार? Bollywood स्टार्सचं फिटनेस प्रेम, लक्झरी वाहनांपेक्षाही वापरतात महागडी सायकल! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींचा ऑनस्क्रीन किसिंग सीन देण्यास नकार न्यासा देवगणची लंडनमध्ये मस्ती, ग्लॅमरस फोटो आले समोर XL वरुन झाली मीडियम साइज, अभिनेत्रीने कसं घटवलं एवढं प्रचंड वजन? जगातील सर्वात अनोखी स्पर्धा सेक्स चॅम्पियनशीप जिंकण्यासाठी फक्त… वेब सीरीजमधील ‘तो’ गायक ‘जो’ बनला निर्दयी खुनी! IPS पत्नीसोबत IAS पतीची परदेशवारी… दिसतायेत दोघंही लय भारी! Gufi paintal : महाभारतात शकुनी मामा लंगडत का चालायचे? Aditi Rao Hydari घटस्फोटनंतर दुसऱ्या अभिनेत्याच्या प्रेमात! थाटणार संसार?