धक्कादायक! डाएट प्लान बदलल्याने प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याच्या पत्नीचं निधन

दाक्षिणात्य अभिनेते भरत कल्याण यांच्या पत्नी प्रियदर्शनी यांचं १ नोव्हेंबरला वयाच्या ४३ व्या वर्षी निधन झालं
TV actor Bharat Kalyan wife Priyadharshini passes away at 43 diet changes suspected
TV actor Bharat Kalyan wife Priyadharshini passes away at 43 diet changes suspected

दाक्षिणात्य अभिनेते भरत कल्याण यांच्या पत्नी प्रियदर्शनी यांचं १ नोव्हेंबरला वयाच्या ४३ व्या वर्षी निधन झालं. चेन्नईतल्या रूग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भरत कल्याण हे दक्षिणतेले प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांनी उत्तम कामं करत दाक्षिणात्य इंडस्ट्रीत आपलं एक नाव बनवलं आहे. डाएट प्लान बदलल्याने प्रियदर्शनी यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.

डाएट प्लानमुळे बिघडली होती प्रियदर्शनी यांची प्रकृती

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार चेन्नईच्या रूग्णालयात काही दिवसांपासून प्रियदर्शनी या कोमात होत्या. भरत कल्याण यांच्या पत्नी प्रियदर्शनी यांनी पलेओ डाएट करण्यास सुरूवात केली होती. डाएटमध्ये बदल केल्यानंतर प्रियदर्शनी यांच्या शरीरावर परिणाम होऊ लागला. त्या आजारी झाल्या, कोमात गेल्या आणि त्यानंतर आज त्यांचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून प्रियदर्शनी यांच्यावर सुरू होते उपचार

गेल्या काही दिवसांपासून भरत कल्याण यांच्या पत्नी प्रियदर्शनी यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र दोन दिवस त्यांची प्रकृती जास्त बिघडत गेली. त्यानंतर १ नोव्हेंबरला म्हणजेच आज त्यांचं निधन झालं. आता २ नोव्हेंबरला म्हणजेच बुधवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

भरत कल्याण आणि प्रियदर्शनी या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. भरत यांच्या पत्नीच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आणि कला क्षेत्रातील अनेकांनी प्रियदर्शनी यांना आदरांजली वाहिली. भरत कल्याण हे दाक्षिणात्य अभिनेते कल्याण कुमार यांचे पुत्र आहेत. भरत कल्याण यांनी अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in