Mumbai Tak /बातम्या / Shah Rukh Khan : मन्नतमधील घुसखोरांबाबत मोठी अपडेट; ८ तास बसले होते लपून
बातम्या मनोरंजन

Shah Rukh Khan : मन्नतमधील घुसखोरांबाबत मोठी अपडेट; ८ तास बसले होते लपून

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्या मन्नत निवासस्थानमध्ये दोन जण अवैधरित्या घुसल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मोठा खुलासा केला आहे. पोलिसांनी सांगितलं की, पकडलं जाण्यापूर्वी दोन्ही आरोपी सुमारे आठ तास शाहरुख खानच्या मेकअप रूममध्ये लपून बसले होते. (two men arrested to illegaly entering shah rukh khan mannat bunglow to meet him)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पठाण साहिल सलीम खान आणि राम सराफ कुशवाह अशी आरोपींची नावं आहेत. दोघेही गुजरातमधील भरूचचे असून ते ‘पठाण’ अर्थात शाहरुख खानला भेटण्यासाठी आले होते, असा दावा केला आहे. मन्नतच्या सुरक्षा रक्षकांनी दोघांनाही पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल आहे. या आरोपींविरुद्ध आता आयपीसीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मन्नतमध्ये प्रवेश केल्यानंतर दोन्ही आरोपी तिसऱ्या मजल्यावर पोहोचले. तिथे शाहरुखच्या मेकअप रुममध्ये घुसले आणि लपले. बऱ्याच वेळानंतर शाहरुखने त्यांना पाहिलं तेव्हा धक्काच बसला. मुंबई पोलिसांनी सांगितल की, हे दोन्ही आरोपी शाहरुख खानला भेटण्यासाठी बंगल्यात घुसले होते आणि सुमारे आठ तास मेकअप रूममध्ये त्याची वाट पाहत राहिले. तपासादरम्यान, दोघेही पहाटे तीनच्या सुमारास दोघेही बंगल्यात घुसले होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांना पकडण्यात आलं होतं.

शाहरूख खानच्या ‘मन्नत’ बंगल्याच्या तिसऱ्या मजल्यापर्यंत घुसले दोन तरूण

शाहरुखच्या बंगल्याची मॅनेजर कॉलीन डिसूझा यांनी सांगितलं की, सुरक्षा रक्षकांनी त्यांना २ मार्चला सकाळी फोन करून या प्रकरणाची माहिती दिली. तसंच बंगल्यात दोन लोक घुसल्याचे सांगितले. एफआयआरनुसार, दोन्ही आरोपींना प्रथम हाऊसकीपिंग कर्मचारी सतीशने पाहिले होते. या दोघांना पाहून शाहरुख खानही थक्क झाला. यानंतर मन्नतच्या सुरक्षा रक्षकांनी दोघांनाही वांद्रे पोलिसांच्या ताब्यात दिले. दोन्ही आरोपींनी मन्नतची बाहेरील भिंत उचकटून बंगल्यात प्रवेश केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

खरंच केसांच्या पिनने कुलूप उघडतं का? समजून घ्या कसं बाबाची एकच चर्चा!गरम तव्यावर बसून भक्तांना आशिर्वाद Palak Tiwari: पलक तिवारीच्या बोल्ड लुकची एकच चर्चा प्रसिद्ध अभिनेत्री आकांक्षा दुबेची आत्महत्या इजिप्तमधल्या गर्लफ्रेंडसोबत सीक्रेट वेडिंग, आता अभिनेता बनला पिता…. IPL five new rules : आता आणखी मजा येणार, पाच नवे नियम आयपीएलचा गेम बदलणार mumbai local mega block today : मुंबईकरांनो, सुट्टीचा प्लान आहे, मग लोकलचे वेळापत्रक जाणून घ्या प्रियकराला विष दिलं नंतर फोनवर म्हणाली, ‘मेला नाहीस तर गळफास घे’ Health Tips: ‘या’ आजारांमध्ये लसूण खाणं ठरू शकतं खतरनाक Janhvi Kapoor: जान्हवीची ग्लॅमरस बोल्ड अदा, पण झाली ट्रोल; यूजर्स म्हणाले प्लॅास्टिक… बागेश्वर बाबासोबत ‘ही’ तरूणी अडकणार लग्नबंधनात? जेव्हा चालू लेक्चरमध्ये विद्यार्थ्याने चक्क बनवला मसाला डोसा, प्राध्यापकही झाले हैराण Kapil Sharma च्या ऑनस्क्रीन गर्लफ्रेंडचा हॉट आणि बोल्ड लूक IPL ची पहिली मॅच केव्हा झालेली? सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू कोण? रक्षकच बनले भक्षक! पोलिसांचाच गॅगरेप पिडितेवर बलात्कार Uttar Pradesh: महिलेच्या हत्येचे गूढ 9 वर्षांनंतर एका पोपटाने उलगडलं… Shraddha Arya: बॉलिवूड अभिनेत्रीने पतीच्या वाढदिवसाला घातली बिकिनी, नेटकरी म्हणाले… प्रसुतीनंतर अभिनेत्रीचं अविश्वसनीय ट्रान्सफॉर्मेशन, घटवलं 10 किलो वजन! Amrita Ahuja: हिंडेनबर्गच्या अहवालात भारतीय वंशीय महिलेचं नाव, गंभीर आरोप 38 कोटींचा बेवारस चेक परत केला अन् जे मिळालं त्याने पायाखालची जमीन सरकली