Madhavi Gogate : जेष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचं कोरोनामुळे निधन

माधवी गोगटे यांना कोरोनाचं निदान झालं होतं. सेव्हन हिल रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
Madhavi Gogate : जेष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचं कोरोनामुळे निधन
अभिनेत्री माधवी गोगटे.

मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचं आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास निधन झालं. त्यांना कोरोनाचं निदान झालं होतं. सेव्हन हिल रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्या 58 वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती आणि मुलगी असा परिवार आहे.

माधवी गोगटे यांनी मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये भूमिका केल्या होत्या. त्यांच्या काही भूमिका चांगल्याच गाजल्या. घनचक्कर, सत्वपरीक्षा इत्यादी चित्रपटातही भूमिका त्यांनी काम केलं होतं. 'गेला माधव कुणीकडे', 'भ्रमाचा भोपळा' ही त्यांची नाटकं चांगलीच गाजली.

'मिसेस तेंडुलकर', 'कोई अपना सा', 'ऐसा कभी सोचा न था', 'एक सफर', 'बसेरा', 'बाबा ऐसो वर ढुंडो', 'ढुंड लेंगी मंजिल हमें', 'कहीं तो होगा' या हिंदी मालिकांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. सोबतच 'तुझं माझं जमतंय' या मराठी मालिकेतही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका केली होती.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in