Amruta Fadnavis: 'मारले नाकर्तेपणावर बाण...' अमृता फडणवीसांचा भन्नाट उखाणा
Amruta Fadnavis: नागपूरमधील महिलांसाठी आयोजित एका खास कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी खास उखाणा घेतला. पाहा त्यावेळी त्या नेमकं काय म्हणाल्या.
ADVERTISEMENT
Amruta Fadnavis: नागपूरमधील महिलांसाठी आयोजित एका खास कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी खास उखाणा घेतला. पाहा त्यावेळी त्या नेमकं काय म्हणाल्या.
Amruta Fadnavis Nagpur: नागपूर: नागपुरात एका कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी उखाण्यातून विरोधकांना टोला हाणला. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होम मिनिस्टर अमृता फडणवीस यांनी उखाण्यातून विरोधकांना टोला लगावला आहे. ज्याचा व्हिडीओ हा सध्या बराच व्हायरल होत आहे. (special song sung by amruta fadnavis see why that video of her in nagpur is going viral)
ADVERTISEMENT
'देवेंद्रजीनी मारले नाकर्तेपणावर बाण, आणि मी घेऊन आली विकासाचे वाण.. आपण सर्वांनी स्वीकारावे आणि एकत्र महाराष्ट्र करू निर्माण' असा उखाणा अमृता फडणवीसांनी यावेळी घेतला.
नागपुरात भारतीय जानता पक्ष महिला आघाडीच्या वतीने सोमवारी रात्री दक्षिण-पश्चिम मंडळाकडून विकासाचे वाण हळदी कुंकू या कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी या कार्यक्रमात महिलांशी संवाद साधला.
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
यावेळी त्यांनी महिलांच्या आग्रहाखातर एक गाणंही गायलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारच्या महिलांसाठी असणाऱ्या अनेक योजनाही त्यांनी यावेळी सांगितल्या.
ADVERTISEMENT