भारत गणेशपुरे, सागर कारंडे खरंच 'चला हवा येऊ द्या' सोडणार आहेत का?

जाणून घ्या भारत गणेशपुरे यांनी याबाबत काय सांगितलं आहे?
भारत गणेशपुरे, सागर कारंडे खरंच 'चला हवा येऊ द्या' सोडणार आहेत का?
Bharat Ganeshpure and Sagar Karande are the Famous Comedy Stars

गेली ८ वर्षे रसिक प्रेक्षकांचा लाडका शो म्हणजे चला हवा येऊ द्या.. या शोचे महाराष्ट्रातच नाही तर जगभरात असंख्य चाहते आहेत..... डॉ.निलेश साबळे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे, सागर कारंडे आणि भाऊ कदम यांचे तर असंख्य फॅन्स आहेत. मात्र आता भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे चला हवा येऊ द्यामध्ये यापुढे दिसणार नाहीत अशी बातमी आली आणि चला हवा येऊ द्याच्या प्रेक्षकांना चांगलाच धक्का बसला.

what bharat ganeshpure told to mumbai tak about the news
what bharat ganeshpure told to mumbai tak about the news

सागर कारंडे आणि भारत गणेशपुरे हे दोघंही मालिका सोडणार आहेत अशा बातम्या आल्या आणि एकच चर्चा सुरू झाली की त्यामागचं नेमकं कारण आहे तरी काय? यानंतर मुंबई तकने थेट भारत गणेशपुरे यांनाच फोन केला. भारत गणेशपुरे यांना या बातम्यांबाबत विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी मुंबई तकला सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

Bharat Ganeshpure and Sagar Karande are the Famous Comedy Stars
'हवा येऊ द्या' च्या सेटवर सोनालीचा कुल अंदाज

भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे हे दोघंही कलाकार आता सोनी टीव्हीवरील इंडियाज लाफ्टर चॅम्पियन या हिंदी कॉमेडी शोमध्ये सहभागी होणार आहेत.. शनिवार आणि रविवार हा शो सोनी टीव्हीवर प्रसारित होणार आहे. नुकताच या शोचा एक प्रोमो प्रसारित झाला,ज्यात भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे एकत्र एक विनोदी स्कीट करताना दिसून आले.. या शोचे जज आहेत अर्चना पुरण सिंग आणि शेखर सुमन. यात भारत आणि सागर सोबत भारतातील अनेक नवीन विनोदवीर सहभागी होणार आहेत.

हा प्रोमो प्रसारित झाल्यानंतर लगेचच भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे चला हवा येऊ द्या शो सोडणार या बातम्यांचं पेव फुटलं. याबद्दल मुंबई तकने भारत गणेशपुरेशी संवाद साधला असता... भारतने सोनी टीव्हीवरचा नवीन कॉमेडी शो सागर कारंडेसोबत करत असल्याला दुजोरा दिला.. मात्र तो आणि सागर कारंडे चला हवा येऊ द्या शो सोडणार या बातम्यांवर महत्वाचं स्पष्टीकरण दिलं.

Bharat Ganeshpure and Sagar Karande are the Famous Comedy Stars
'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर अनिता दातेची एन्ट्री

काय सांगितलं आहे भारत गणेशपुरे यांनी?

भारत गणेशपुरे यांनी सांगितलं की मी आणि सागर कारंडे जरी नवीन हिंदी कॉमेडी शो करत असलो तरी आम्ही कधीही चला हवा येऊ द्या कार्यक्रम सोडणार नाही... चला हवा येऊ द्या आणि इंडियाज लाफ्टर चँम्पियन या दोन्ही शोचं शुटींग वेगवेगळ्या दिवशी आहे. आणि ते सांभाळून आम्ही दोन्ही शो मध्ये काम करत राहणार आहोत.. त्यामुळे भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे चला हवा येऊ द्या कार्यक्रम सोडणार नाहीत या बातमीवर पडदा पडला.. उलट भारत आणि सागरच्या विनोदाचा डबल बोनांझा रसिक प्रेक्षकांना मिळणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in