मोनालिसाची ही पेंटिंग जगात इतकी लोकप्रिय का, सम्राट नेपोलियनचं कनेक्शन काय?
22 ऑगस्ट 1911 या वर्षापासून मोनालिसाच्या कहाणीला सुरुवात झाली. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये लूव नावाचं एक संग्रहालय आहे, जे उघडण्याची तयारी सुरू होती. लूव हे जगातील सर्वात मोठं संग्रहालय आहे. हॉलिवूड चित्रपटांमधील तुम्ही जर पेंटिंग्स पाहिल्या असतील तर त्यातील बहुतेक पेंटिंग्स लूवमध्ये आहेत.
ADVERTISEMENT

Mona Lisa Painting History : जगात दोन पेंटिंग सर्वात जास्त प्रसिद्ध आहेत. यामध्ये योगायोग असा आहे की, दोन्ही पेंटिंगच्या चित्रकारांची नावं लिओनार्डो आहे. यामधील एक प्रसिद्ध पेंटिंग म्हणजे टायटॅनिक चित्रपटातील जे लिओनार्डो द कॅप्रिओने बनवले होते. तर दुसरे प्रसिद्ध पेंटिंग मोनालिसाचे आहे जे लिओनार्डो दि विंचीने बनवले होते. (How did the painting of Mona Lisa get worldwide fame)
टायटॅनिकमधील पेंटिंग प्रसिद्ध आहे कारण, चित्रपट प्रसिद्ध असल्यामुळे पेंटिंगही प्रसिद्ध आहे. पण प्रश्न असा आहे की लिओनार्डो द विंचीची पेंटिंग, मोनालिसा जगभर एवढी प्रसिद्ध कशी झाली? ज्या व्यक्तीला पेंटिंगमध्ये अजिबात रस नाही अशा व्यक्तीलाही या पेंटिंगचं नाव माहिती आहे. कदाचित तुम्ही ऐकले असेल की मोनालिसाच्या प्रसिद्धीचे कारण तिचे रहस्यमयी स्मित हास्य आहे. पण हे खरं आहे का? किंवा आणखी काही कारण आहे. या पेंटिंगचा इतिहास काय आहे? ते इतकं प्रसिद्ध कसं झालं आणि त्याची किंमत किती? याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊयात.
Maharashtra Politics : शिंदेंची खेळी… 12 आमदार नियुक्तीत ‘मविआ’ला कसा बसला झटका!
Mona Lisa पेंटिंगची झाली होती चोरी…
22 ऑगस्ट 1911 या वर्षापासून मोनालिसाच्या कहाणीला सुरुवात झाली. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये लूव नावाचं एक संग्रहालय आहे, जे उघडण्याची तयारी सुरू होती. लूव हे जगातील सर्वात मोठं संग्रहालय आहे. हॉलिवूड चित्रपटांमधील तुम्ही जर पेंटिंग्स पाहिल्या असतील तर त्यातील बहुतेक पेंटिंग्स लूवमध्ये आहेत. जगातील सर्वात प्रसिद्ध पेंटिंग मोनालिसा देखील येथेच आहे.
1911 मध्ये त्यादिवशी सकाळी लूवमध्ये खूप गोंधळ उडाला. कारण लुई बेरुड नावाचा प्रसिद्ध चित्रकार संग्रहालयाला भेट देणार होता. लुई बेरुड त्यादिवशी मोनालिसाची कॉपी बनवणार होता. पण तो पेंटिंगजवळ पोहोचताच. तिथलं दृश्य वेगळं होतं. पेंटिंग ऐवजी तिथे चार खिळे आणि धुळीचा थर होता. हे पाहून लुई बेरुड गार्डला विचारू लागला की, लिओनार्डोची मोनालिसा पेंटिंग कुठेय?










