Optical illusion : डोळ्यांना चकवा देणारा फोटो व्हायरल! हुशार आहात? मग शोधून दाखवा या फोटोत लपलेले अंक

मुंबई तक

Optical Illusion IQ Test: ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो अशाप्रकारचे ब्रेन टीझर आहेत, जे तुमच्या बुद्धीला चालना तर देतातच. पण काही फोटो असे असतात, ज्यांना पाहिल्यावर सर्वांचाच गोंधळ उडतो

ADVERTISEMENT

Optical Illusion IQ Test
Optical Illusion IQ Test
google news

बातम्या हायलाइट

point

ऑप्टिकल इल्यूजनचा सर्वात कठीण फोटो व्हायरल झालाय

point

कोण कोण शोधून दाखवणार या फोटोत लपलेले अंक

point

...तरच तुम्हाला शोधता येतील फोटोत लपलेले अंक

Optical Illusion IQ Test: ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो अशाप्रकारचे ब्रेन टीझर आहेत, जे तुमच्या बुद्धीला चालना तर देतातच. पण काही फोटो असे असतात, ज्यांना पाहिल्यावर सर्वांचाच गोंधळ उडतो. अशाचप्रकारचा डोळ्यांना चकवा देणारा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या फोटोत अनेक अंक लपले आहेत. पण ते शोधण्यासाठी तल्लख बुद्धीचा वापर करावा लागणार आहे. ज्या लोकांना या फोटोत लपलेले अंक अचूकपणे शोधायचे असतील, त्यांना बुद्धीचा कस लावावा लागणार आहे. कारण या फोटोत लपलेले अकं शोधण्यासाठी तुमच्याकडे फक्त 9 सेकंदांचा वेळ असणार आहे.

ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो तुमचा फोकस सेट करतात आणि क्रिएटिव्हीटी वाढवतात. अशाच प्रकारचा एक ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हा फोटो लोकांचं लक्ष वेधून घेत आहे.  @Brainy_Bits_Hub नावाच्या अकाऊंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोला पहिल्या नजरेत पाहिल्यावर तुम्हाला एक पॅटर्न दिसेल. या पॅटर्नमध्ये काही अंक लपले आहेत. ते नंबर कोणते आहेत, याचा तुम्हाला शोध लावायचा आहे. 

हे ही वाचा >> Suresh Dhas Parbhani : अजितदादा क्या हुआ ते वादा? बीडमधील परिस्थिती सांगत सुरेश धस यांचा तुफान हल्लाबोल

या ऑप्टिकल इल्यूजनच्या टेस्टमध्ये यशस्वी होण्यासाठी आम्ही तुम्हाला एक हिंट देत आहोत. या फोटोतील पॅटर्नमध्ये 6 अंक लपले आहेत. जे तुम्हाला शोधायचे आहेत. सोशल मीडियावर या ब्रेन टीझरने लोकांना घाम फोडला आहे. हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय की, तुम्हाला काय नंबर दिसत आहे? हे नंबर शोधण्यासाठी आम्ही तुम्हाला सात सेकंदाचा वेळ दिला आहे. 

हे ही वाचा >> Crime News : बहिणीचे प्रेमसंबंध असल्याचा राग, भावानं थेट पेट्रोल टाकून बहिणीला जिवंत...

या फोटोतील पॅटर्नमध्ये लपलेले नंबर शोधण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागला, याबाबत जाणून घेऊयात. अजूनही तुम्हाला हे नंबर शोधता आले नसतील, तर टेन्शन घ्यायची गरज नाही. कारण आम्ही तुम्हाला या अचूक उत्तर सांगणार आहोत. 387695 हे नंबर या फोटोतील पॅटर्नमध्ये लपले आहेत. या नंबर्सला शोधण्यासाठी तुम्हाला स्क्रीनला थोडं मागच्या बाजूने सरकवावं लागेल आणि तीक्ष्ण नजरेने पाहिल्यावर तुम्हाला हे नंबर्स पाहायला मिळतील. 

हे वाचलं का?