Kitchen Tips: कुकर आणि कढई काळीकुट्ट झालीय? 'या' सोप्या ट्रिक्स वापरा, भांडी होतील दुधासारखी शुभ्र
Kitchen Tips To Clean Burnt Steel Utensils : दिवाळीचा सण-उत्सव सुरु झाला आहे. घरी पाहुण्यांचं आगमनही होणार आहे. त्यामुळे किचनमध्ये चविष्ट खाणं बनवण्यात तुम्ही व्यस्त असाल, हे मात्र नक्की.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

किचनमध्ये काळीकुट्ट झालेली भांडी पांढरीशुभ्र कशी करायची?

या सोप्या किचन टीप्स वाचा अन् काळी भांडी करा चकाचक

...म्हणून गॅसवर ठेवलेली भांडी होतात काळीकुट्ट
Kitchen Tips To Clean Burnt Steel Utensils : दिवाळीचा सण-उत्सव सुरु झाला आहे. घरी पाहुण्यांचं आगमनही होणार आहे. त्यामुळे किचनमध्ये चविष्ट खाणं बनवण्यात तुम्ही व्यस्त असाल, हे मात्र नक्की. पण दररोजचं जेवण शिजवून किचनमधील गॅस आणि कुकर काळीकुट्ट झाली असेल, तर मग तुम्हाला आम्ही सांगितलेल्या या सोप्या ट्रिक्सचा वापर नक्कीच करावा लागेल. कारण या ट्रिक्समुळे गॅसवर काळीकुट्ट झालेली भांडी काही वेळातच पांढरीशुभ्र होतील.जेवण शिजवताना गरम उष्णतेमुळं गॅसवर ठेवलेल्या भांड्याला काळ्या रंगाची चादर पसरते. म्हणजेच जळलेलं अन्न त्या भांड्याला चिपकतं.
विशेषत: कुकरमध्ये जेवण शिजवताना असं काही घडतं. त्यामुळे भांड्याला चिपकलेले अन्नपदार्थ साफ करणं खूप कठीण बनतं. भांडं अनेकदा रगडूनही हे चिपकलेलं अन्न पूर्णपणे साफ होत नाही. त्यामुळे भांड्याला दुर्गंधी येते. अशाप्रकारच्या समस्यांवर उपाय शोधत असाल, तर आम्ही सांगितलेल्या या ट्रिक्स तुम्हाला खूप उपयोगी ठरू शकतात. आम्ही तुम्हाला किचनच्या जबरदस्त टीप्स सांगणार आहोत, ज्या फॉलो केल्यावर तुमची मेहनत आणि वेळही वाचेल. तसच काळीकुट्ट झालेली भांडी नव्यासारखी चमकतील. जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.
हे ही वाचा >> Optical Illusion: ऑप्टिकल इल्यूजनने अनेकांना फोडलाय घाम! फोटोत लपलेली कार शोधण्यासाठी तुम्हीही लावा जोर
या आहेत जबरदस्त किचन टीप्स
- भांड्याच्या वरच्या भागात जळलेले अन्नपदार्थ चिपकलेले असतात. हे साफ करण्यासाठी सर्वात आधी त्या भांड्यात पाणी भरा. त्यात थोड्या प्रमाणात बेकिंग सोडा टाका.
- भांड्यातील पाणी गरम करण्यासाठी गॅसवर ठेवा.
- पाणी पाच-सात मिनिटे उकळल्यानंतर थोडा वेळ थंड करा.
- पाणी थंड झाल्यानंतर भांड्यातून बाहेर काढा. त्यानंतर लोखंडी किंवा स्टीलच्या वस्तुने या भांड्यातील जळलेला भाग रगडा.
- असं केल्यानंतर भांड्याला चकाकी येईल. शेवटी डिश वॉशरच्या मदतीने भांड्याला चांगल्या प्रकारे साफ करा.
- या सोप्या ट्रिक्स डिजिटल क्रिएटर शशांक आल्शी यांनी इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केल्या आहेत.